महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Parambir Singh Vs State:परमबीर सिंग संदर्भातील तपास ९ मार्चपर्यंत थांबवा सुप्रीम कोर्टाचे आदेश - सुप्रीम कोर्ट

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Former Mumbai Police Commissioner Parambir Singh) यांच्याविरुद्ध सुरू असलेला तपास ९ मार्चपर्यंत थांबवण्यात यावा असे आदेश सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) महाराष्ट्र शासनाला (Government of Maharashtra) दिले आहेत.

Param Bir Singh
परमबीर सिंग

By

Published : Feb 22, 2022, 12:26 PM IST

Updated : Feb 22, 2022, 12:46 PM IST

नवी दिल्ली: सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारला मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरुद्ध सुरू असलेला तपास ९ मार्चपर्यंत थांबवायला सांगितला आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याबाबत ९ मार्च रोजी अंतिम निर्णय घेण्यात येईल, तो पर्यंत हा तपास थांबवण्यात यावा असे न्यायालयाने म्हटले आहे.

महाराष्ट्र सरकारने दाखल केलेले सर्व गुन्हे रद्द करावे किंवा सीबीआयकडे वर्ग करावेत, अशी मागणी करणारी याचीका परमबीर सिंग यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. परमबीर सिंग यांच्याविरोधातील सर्व एफआयआर केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) हस्तांतरित करायचे की नाही याचा निर्णय सर्वोच्च न्यायालय घेणार आहे. या प्रकरणाची अंतिम सुनावणी ९ मार्च रोजी होणार आहे. तोपर्यंत महाराष्ट्र सरकार या सर्व प्रकरणांची चौकशी थांबवावी असे न्यायालयाने म्हटले आहे.

Last Updated : Feb 22, 2022, 12:46 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details