महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पंतप्रधानांच्या जनता कर्फ्यूला पाठिंबा मात्र आम्हालाही न्याय द्यावा; सीएएविरोधी आंदोलनकर्त्यांची मागणी - सीएए

पंतप्रधानांनी पुकारलेल्या जनता कर्फ्यूला आमचा पाठिंबा आहे. मात्र, त्यांनी आम्ही सुरू केलेल्या आंदोलनाचाही विचार करावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी, मागणी सीएए विरोधी आंदोलनकर्त्या महिलांनी केली.

caa janta curfew
पंतप्रधानांच्या जनता कर्फ्यूला पाठिंबा मात्र आम्हालाही न्याय द्यावा; सीएएविरोधी आंदोलनकर्त्यांची मागणी

By

Published : Mar 23, 2020, 4:01 AM IST

मुंबई - शाहिन बागच्या धर्तीवर मुंबईमध्ये सुरू असलेले 'मुंबई बाग' हे नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधातील आंदोलन 57 दिवसांपासून सुरूच आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना तीन दिवसांपूर्वी 'जनता कर्फ्यू'चे आवाहन केले होते. त्यानुसार देशभर रविवारी कर्फ्यू पाळण्यात आला. मात्र, नागपाडा येथील सीएए विरोधी आंदोलनकर्त्यांनी आंदोलकांची संख्या कमी करून कर्फ्यूला पाठिंबा असल्याचे सांगितले.

पंतप्रधानांच्या जनता कर्फ्यूला पाठिंबा मात्र आम्हालाही न्याय द्यावा; सीएएविरोधी आंदोलनकर्त्यांची मागणी

हेही वाचा -देशभरात घुमला टाळ्या-थाळ्या अन् घंटानाद, अवघ्या देशानं व्यक्त केली कृतज्ञता

विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी देशभरात रविवारी एक दिवस जनता कर्फ्यू पाळण्यात आला. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागपाडा येथील सीएए विरोधी आंदोलनस्थळी गर्दी होणार नाही म्हणून, काळजी घेतली होती. रविवारी फक्त 25 महिलांनी आंदोलनस्थळी हजेरी लावली. "आम्ही एक विशिष्ट अंतर ठेवून आंदोलन सुरू ठेवले आहे. मात्र, या आंदोलनातून कोणालाही त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेत आहोत. त्यासाठी या ठिकाणी स्वच्छता राखली जात आहे." अशी माहिती आंदोलनकर्त्या महिलेने दिली.

पंतप्रधानांनी पुकारलेल्या जनता कर्फ्यूला आमचा पाठिंबा आहे. मात्र, त्यांनी आम्ही सुरू केलेल्या आंदोलनाचाही विचार करावा आणि आम्हाला न्याय मिळवून द्यावा अशी आंदोलनकर्त्या महिलांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details