मुंबई Sunny Leone Item Song : गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटात 'आयटम सॉंग' असणं गरजेचं बनलेलं दिसतंय. त्यातच आता या आयटम सॉंग्समध्ये आघाडीच्या अभिनेत्री दिसत आहेत. आयटम सॉंग प्रेक्षकांच्या विरंगुळ्यासाठी बनविण्यात येतं. बऱ्याचदा अशा गाण्यांमुळं चित्रपटाला प्रसिद्धी मिळते. त्याचा चांगला परिणाम बॉक्स ऑफिसवर दिसून येत असतो. अशा 'तडका' लावलेल्या गाण्यामुळे थिएटर्समध्ये शिट्या टाळ्या वाजत असतात. माधुरी दीक्षित, शिल्पा शेट्टी, करीना कपूर खान, बिपाशा बासू, कतरीना कैफ यासारख्या अनेक तारकांनी चित्रपटांमध्ये आयटम नंबर्स केले आहेत. आता सनी लिओनी एका ढासू आयटम नंबरमध्ये दिसणार आहे. माधुरी दीक्षितच्या एका गाजलेल्या गाण्यावर ती थिरकताना दिसणार आहे. (Sunny Leone item song on Madhuri Dixit song)
गाण्यांचा रिमेक : हिंदी चित्रपटांमध्ये रिमेक सॉंग्स हा ट्रेंड रुजताना दिसतोय. जुन्या गाजलेल्या गाण्यांना आधुनिकतेनं पुनरुज्जीवित करत गाण्यांचा रिमेक होताना दिसतोय. आँख मारे, तम्मा तम्मा, मुकाबला, सावन में लग गयी आग, तसंच नुकतंच प्रदर्शित झालेल्या जवानमधील रमैय्या वस्तावैय्या सारखी अनेक गाणी रसिकांनी उचलून धरली आहेत. त्यामुळे गाजलेल्या गाण्यांना नवीन स्वरूपात प्रेक्षक स्वीकारताना दिसत आहेत. या ट्रेंडला अनुसरूनच एका नवीन चित्रपटात माधुरी दीक्षितच्या एका गाजलेल्या गाण्यावर सनी लिओनी थिरकताना दिसणार आहे. (Sunny Leone on Madhuri Dixit song)