महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sunil Tatkare Reaction: शरद पवार यांच्यासोबत आमची तुलनाच करू शकत नाही - सुनील तटकरे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, मंत्री छगन भुजबळ यांचा बालेकिल्ला असलेल्या येवल्यात सभा घेतली. राष्ट्रवादी पक्षाकडून शक्तीप्रदर्शन देखील करण्यात आले. शरद पवार देशाचे मोठे नेते त्यामुळे त्यांचे स्वागत होणे स्वाभाविक आहे. ज्यावेळी अजित पवार दौऱ्यावर निघतील त्यावेळी देखील जोरदार स्वागत केले जाईल, असा ठाम विश्वास आहे. शरद पवार यांच्या सोबत आम्ही तुलनाच करू शकत नाही, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केली आहे.

Sharad Pawar and Sunil Tatkare
शरद पवार आणि सुनील तटकरे

By

Published : Jul 8, 2023, 8:34 PM IST

प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर प्रथमच शरद पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला येथे सभा घेतली. शरद पवार यांचे जंगी स्वागत येवला येथे करण्यात आले. यावर प्रतिक्रिया देताना सुनील तटकरे म्हणाले की, शरद पवार हे देशाचे नेते आहेत. त्यामुळे त्यांचे स्वागत होणे स्वाभाविक आहे. ज्यावेळी अजित पवार हे दौऱ्यावर निघतील त्यावेळी देखील जोरदार स्वागत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच आम्ही शरद पवार यांच्याशी स्वतःची, कोणाचीच तुलनाच करु शकत नाही. तसा तुलनेचा भविष्यातही आमचा मानस नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.



अनेक गोष्टी घडण्यास कारणीभूत: शरद पवार यांच्या कोणत्याही वक्तव्यावर आपण प्रतिक्रिया देणार नसल्याचे सुनील तटकरे यांनी म्हटले आहे. तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्यावर बोलण्यास नकार देत काही बोलणार नाही, मात्र अलीकडे आव्हाडांची काही वक्तव्ये बघितली तर अनेक गोष्टी घडण्यास कारणीभूत ठरल्या आहेत, असे तटकरे म्हणाले.

संभ्रम निर्माण करण्यासाठी: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सत्तेत सामील झाल्यानंतर गेल्या दोन दिवसात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्या संदर्भातील चर्चा सुरू आहे. त्यातच विधानसभा अध्यक्षांनी शिंदे गटाच्या आणि ठाकरे गटाच्या आमदारांना अपात्रतेसंदर्भातील नोटीस पाठवून, सात दिवसात आपले म्हणणे मांडावे अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अस्वस्थ नाहीत. आमदारांच्या अपात्रतेसंदर्भातील सुप्रीम कोर्टाने अध्यक्षांचे अधिकार स्पष्ट केले आहेत. राहुल नार्वेकर हे योग्य तो निर्णय घेतील. संभ्रम निर्माण करण्यासाठी एकनाथ शिंदे हे अस्वस्थ असण्याच्या चर्चा केल्या जात आहेत. आज मुख्यमंत्री आणि दोघेही उपमुख्यमंत्री गडचिरोली दौऱ्यावर आहेत, येत्या दोन तीन दिवसात खातेवाटपाचा निर्णय होणार आहे.



रायगडमध्ये कटूता येऊ देणार नाही : रायगड जिल्ह्यात कुरबुरी आधीपासून होत्या. मात्र आता एकत्र काम करायचे म्हटल्यास सर्वांना समजदारीने घ्यावे लागेल. रायगडमध्ये काही कटूता येणार नाही, याबाबत मी स्वतः प्रयत्न करणार आहे. आज अजित पवारांना समर्थन करणाऱ्यांची संख्या ही ४० पेक्षा जास्त आहे एवढच सांगेन, असे सुनील तटकरे म्हणाले.


हेही वाचा -

  1. Maharashtra Political Crisis : दौऱ्याची सुरुवात करण्यास नाशिकच का निवडले, शरद पवारांनी पत्रकार परिषदेत केला खुलासा
  2. NCP Political Crisis: शरद पवारांच्या सभेला छगन भुजबळ रॅलीने देणार उत्तर, नाशिकमध्ये शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी
  3. Sharad Pawar in Yeoala - वयाची भाषा कराल तर महागात पडेल, शरद पवारांचा इशारा

ABOUT THE AUTHOR

...view details