महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेच्या प्रतोदपदावर सुनील प्रभूंची निवड - शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे

शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांची आज निवड करण्यात आली. नवनिर्वाचित आमदार, शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला. त्यानंतर शिंदे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना सोबत घेऊन महाराष्ट्रच्या जनतेला न्याय देण्याचे काम केले जाईल, असे आश्वासन दिले.

सुनील प्रभू

By

Published : Oct 31, 2019, 4:25 PM IST

मुंबई- सुनील प्रभू यांची विधानसभेतील शिवसेनेचे पक्ष प्रतोदपदी निवड करण्यात आली. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यासह सर्व मतदारांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे. त्याबद्दल सर्वांचे आभार, अशी भावना विधानसभेचे मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी व्यक्त केली.

सुनील प्रभू ईटीव्ही भारतशी बोलताना

हेही वाचा -सेना-भाजपचे जनतेच्या हिताकडे दुर्लक्ष - बाळासाहेब थोरात

आज शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली. नवनिर्वाचित आमदार, शिवसेना युवानेते आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव बैठकीत मांडला. त्यानंतर शिंदे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. यावेळी एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना सोबत घेऊन महाराष्ट्रच्या जनतेला न्याय देण्याचे काम केले जाईल, असे आश्वासन दिले.

हेही वाचा - टिळक भवन येथे काँग्रेसच्या बैठकीला सुरुवात; नवनिर्वाचित आमदारांचे स्वागत

महाराष्ट्रात सत्य काय आहे, हे मांडण्यासाठी जनतेने आपल्याला विधिमंडळात पाठवले आहे. त्यामुळे जनतेचे म्हणणे व्यवस्थितपणे मांडा, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना सूचना केल्या आहेत, अशी माहिती सुनील प्रभू यांनी दिली. तसेच सत्ता स्थापनेबाबत पक्षप्रमुख जो निर्णय घेतील, तो मान्य आहे, असेही प्रभू यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details