प्रतिक्रिया देताना चित्रकार सुनील नाईक मुंबई 26/11 Mumbai Terror Attack : मुंबईवर झालेला भीषण दहशतवादी हल्ला म्हणजेच 26/11. या हल्ल्याला पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत. 26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईला हादरून टाकणारा भीषण दहशतवादी हल्ला झाला होता. हा हल्ला अजूनही सर्व मुंबईकरांच्या लक्षात आहे. या हल्ल्यात अनेक पोलीस आणि जवानांनी जीवाची आहुती दिली आणि हुतात्मा झाले. 26/ 11 च्या मुंबई हल्ल्यातील हुतात्मा याना 26 नोव्हेंबरला मुंबईतच नव्हे, तर देशभरात आदरांजली वाहिली जाते.
रेल्वे स्थानकाचे चित्र रेखाटण्याचं केलं काम : क्रूरकर्मा अजमल कसाब याला फासावर चढवेपर्यंत अनेक कर्तव्यदक्ष आणि जिगरबाज पोलिसांनी आपले चोख काम बजावलं होतं. या पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे अनेक सर्वसामान्य आहात होते. त्यापैकीच एक म्हणजे चित्रकार सुनील नाईक. सुनील नाईक हे जेजे स्कूल ऑफ आर्टचे विद्यार्थी असून करियर कॉलेजचे प्राध्यापक आहेत. तसेच ते कलादिग्दर्शक म्हणून देखील काम करतात. पोलिसांना मदत म्हणून 26/11 या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर सीएसएमटी रेल्वे स्थानकाचे चित्र रेखाटण्याचं काम सुनील नाईक (Sunil Naik On Mumbai Terror Attack) यांनी केलं. हे चित्र कोर्टात सादर करण्यात आलं होतं.
17 एकरचा परिसर फिरून काढाले चित्र :सीएसएमटी रेल्वे स्थानकाचा (CST Railway Station) 17 एकरचा परिसर चित्रकार सुनील नाईक यांनी पिंजून काढला. यासाठी त्यांना तब्बल दोन दिवस लागले होते. त्यानंतर सात ते आठ दिवस सीएसएमटी रेल्वे स्थानकाचं चित्र काढायला लागले होते. सुनील नाईक यांनी सांगितलं की, मी जवळ-जवळ 10 दिवस संपूर्ण 17 एकरचा सीएसएमटी रेल्वे स्टेशनचा परीसर प्रत्येक प्लॅटफॉर्म पायी फिरुन नकाशा काढत होतो. कसाब आला कोठून, आणि स्टेशन बाहेर पडला कोठून, कोठे हॅन्ड ग्रेनेट फेकले. कुठे मशिनगन चालविली. शंशाक शिंदे कोठे मारले. असे सारे काही चित्रात रेखाटायचं होतं.
स्केच काढणं होतं आव्हान :खरं म्हणजे तो काळ आणि तेव्हाचा संपुर्ण सीएसएमटी रेल्वे स्टेशन परिसर हा आर.पी.एफ तसेच सीआडी पोलिस अधिकारी यांनी वेढून गेला होता. तेव्हा प्रत्येक मानवी चेहरा प्रत्येकाकडे संशयाने पहायचा. अशा वेळी त्या परिसरातील स्केच काढणं मोठे कठिण काम होतं. माझ्यासमोर आव्हानच होते. तेव्हाचे पोलिस नाईक संजय पाटील तसेच त्यांचे मित्र पोलिस नाईक प्रदिप शिंदे ह्या दोन व्यक्तींनी मला प्रोटेक्ट केलं होत.
कसाबला फाशी देण्यासाठी झाली मदत: पोलिस नाईक संजय पाटील कसाबच्या घटनेचे ठिकाण समजावून सांगत होती. त्यावेळी हा संपूर्ण गोष्टीवर तेव्हाचे सी एसएमटी रेल्वे पोलिस स्टेशन इंनचार्ज दिलीप माने, ए.सी.पी. बापू ठोंबरे हे होते. संपूर्ण परीसर चालून आल्यानंतर ते त्यांच्या कॅबिनमध्ये आम्हाला चहा पाजत असतं. त्यावेळी रेल्वे पोलिस कमिशनर ए.के.शर्मा तसेच डि.जी.रघुवंशी, डिसीपी कोरेगावकर या डिटेल सीएसएमटी रेल्वे स्थानकाच्या नकाशावर खुश झाले होते. कारण कसाबला फाशी देण्यासाठी स्पॉट पंचनाम्याचे चित्र अतिशय महत्वाचे ठरणार होते.
आजही आठवतो मानवी रक्ताचा सडा: त्यावेळी तिथे येणारे विविध पत्रकार माझा स्केच काढतानाचा फोटो काढण्यास मागत होते. परंतू कॉन्फिडेंशल इश्यू म्हणून पोलिसांनीच नकार दिला होता. आज बऱ्याच दिवसानंतर तुमच्या पत्रकारतीने त्या साऱ्या आठवणी जाग्या झाल्या. एक तर देशप्रेमासाठी तसेच कसाबसारख्या आंतकवाद्याला कठोर शासन होण्यासाठी, मी हे काम 10 दिवसात मन लावून पूर्ण केलं होतं. त्यावर बारिक अक्षरांनी घटना क्रमांक तसेच कसाबने कोणती शस्त्रे कोठे वापरली हे नमूद करण्यात केलं होतं. त्यावेळी कसाबच्या बोटाएवढ्या आकाराच्या बूलेट तसेच एके 56 आणि त्याला लावलेली पाठपोठ ऊभी आडवी मॅगझिनस तसेच सीएसएमटी रेल्वे स्टेशनला बॅगेत लपविलेले चहा पावडर सारखे दिसणारे आरडी एक्स हे सगळ्या गोष्टी मला प्रत्यक्ष पहाता आल्या. आजही न विसरता येणारा मानवी रक्ताचा सडा, इतरत्र पडलेल्या सामानाच्या बॅगा, मला कधी सीएसएमटी रेल्वे स्टेशनला गेलो की दिसायला लागतात, अशी आठवणी सुनील नाईक यांनी सांगितली.
हेही वाचा -
- ‘असा’ झाला होता 26/11 चा दहशतवादी हल्ला; अनेकांचे जीव वाचवणारा छोटू चायवालाने सांगितल्या कटू आठवणी
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन; मध्य रेल्वे 14 विशेष ट्रेन चालवणार; जाणून घ्या वेळापत्रक
- मुंबई दहशतवादी हल्ल्याला 15 वर्ष; आजही जखमा ताज्या