अंधेरीत गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे इमारतीला आग
मुंबई - अंधेरीतील यारी रोड परिसरात असलेल्या निवासी इमारतीत आग लागल्याची घटना घडली. सरिता असे इमारतीचे नाव आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर सिलेंडर गळतीमुळे सकाळी 11 वाजून 22 मिनिटांच्या आग लागली.
सविस्तर वृत्त - http://bit.ly/2J0Ht5s
बुरखा बंदी मुद्यावरून खा. संजय राऊत यांची माघार.. म्हणाले ते माझे वैयक्तीक मत, शिवसेनेची भूमिका नाही
मुंबई - श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोटानंतर राष्ट्रीय सुरक्षेसाठी मुस्लीम महिलांच्या बुरख्यावर बंदी घालण्यात आली आहे. तशी बंदी भारतातही लागू करण्याची मागणी शिवसेनेचे मुखपत्र सामनामधून करण्यात आली होती. मात्र, बुरखा बंदीच्या मागणीवरून राजकरण तापू लागताच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आता घुमजाव केले आहे. बुरखा बंदीची मागणी शिवसेनेची नसून ते माझे वैयक्तीक मत आहे, असा खुलासा राऊत यांनी केला आहे. 'मि. ओवेसी, घटना पुन्हा वाचा' मथळ्याखालील रोकठोक या सदरात राउत यांनी हे स्पष्टीकरण दिले आहे.
सविस्तर वृत्त - http://bit.ly/2VOsnGg
नरेंद्र मोदी १८० डिग्रीचे पंतप्रधान, जे बोलतात त्याच्या उलटे काम करतात - अखिलेश
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीच्या मागील टप्प्यांमध्ये भाजप मागे पडत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषा आता बदलली आहे. पंतप्रधान मोदी लोकांची दिशाभूल करत आहेत. कारण त्यांच्याकडे बोलण्यासारखे विषयच नाहीत. विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न आणि इतर समस्यांविषयी ते बोलायला तयार नाहीत, असे समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सांगितले.
सविस्तर वृत्त - http://bit.ly/2VI7Xiq
कुंचल्यात जुलमी राजवट उलथवण्याची ताकद, जागतिक व्यंगचित्र दिनाच्या राज ठाकरेंकडून शुभेच्छा
मुंबई - असं म्हणतात की, हजार शब्दांच्या एका लेखापेक्षा एका व्यंगचित्राची ताकद जास्त असते. कारण, व्यंगचित्राच्या माध्यमातून एखाद्या विषयावर, एखाद्या घटनेवर मार्मिक भाष्य करता येते. आज जगभर जागतिक व्यंगचित्र दिन साजरा होत आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आणि व्यंगचित्रकार राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुकवरुन व्यंगचित्रकारांना शुभेच्छा दिल्या आहेत. व्यंगचित्रकारांच्या कुंचल्यात इतकी ताकद असते की, एखादी जुलमी राजवट उलथवली जाऊ शकते, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.
सविस्तर वृत्त - http://bit.ly/2H1iYBO
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आनंदराज आंबेडकरांचा दिल्लीत काँग्रेसला पाठिंबा
नवी दिल्ली - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू व प्रकाश आंबेडकर यांचे बंधू आनंदराज आंबेडकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याची चर्चा आहे. दिल्ली येथे रिपब्लिकन सेनेने सात उमेदवार उभे केले होते. हे सात उमेदवारही त्यांनी मागे घेतले असून त्यांच्या उमेदवारांना काँग्रेसला पाठिंबा देण्याचे आवाहन आनंदराज आंबेडकर यांनी केले आहे.
सविस्तर वृत्त - http://bit.ly/2LlyRIM
दिवसा अभिनय करून रात्री ऑटोरिक्षा चालवते 'ही' मराठी अभिनेत्री, बोमन इराणींनी म्हटले 'सुपर लेडी'!
मुंबई - बॉलिवूड अभिनेते बोमन इराणी यांनी अलिकडेच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिओत बोमण इराणी हे ऑटोरिक्षा चालवणाऱ्या महिलेबरोबर पाहायला मिळत आहेत. या व्हिडिओच्या व्हायरल होण्यामागचे कारणही तसेच आहे. कारण, ऑटोरिक्षा चालवणारी ही महिला मराठी मालिकेची अभिनेत्री आहे.
सविस्तर वृत्त -http://bit.ly/2VMHjF4