मुंबई - उधार मालाचे पैसे न मिळाल्याने कांदिवलीत एका व्यक्तीने आत्महत्या केली आहे. ही घटना उत्तर मुंबईतील कांदिवली परिसरात घडली. ( Suicide in Kandivali ) ओमप्रकाश स्वामी असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. १० मार्चला ओमप्रकाश स्वामीने आत्महत्या केली. यानंतर आरोपीला १९ फेब्रुवारीला अटक करण्यात आली. ( Railway Police on Kandivali Sucide )
ओमप्रकाश होता तणावाखाली -
ओमप्रकाश स्वामीने आरोपी चिनप्पा रेड्डी याला ८२ लाख रुपयांचा माल उधार दिला होता. आरोपी चिनप्पा रेड्डी हा कपड्यांचा व्यवसाय करतो आणि विष्णू ट्रेड नावाची कंपनी चालवतो. मात्र, बराच वेळ होऊनही चिनप्पा रेड्डी यांनी ओमप्रकाश स्वामी यांना पैसे परत केले नाहीत. त्यामुळे ओमप्रकाश खूप तणावाखाली होता. अखेर वैतागून ओमप्रकाश यांनी १० मार्च २०२१ रोजी आत्महत्येचे शेवटचे पाऊल उचलले.