मुंबई-बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती तिचे फोटोस इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. नुकताच तिने एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात ती ऑलिव्ह बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसली आहे. एका आकर्षक रंगवलेल्या भिंतीजवळ तिने सुंदर पोज दिली आहे.
सुहाना खानचा नवीन लुक.. - suhana instagram
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानची मुलगी सुहाना खान सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. ती तिचे फोटोस इंस्टाग्रामवर पोस्ट करत असते. नुकताच तिने एक फोटो पोस्ट केला आहे ज्यात ती ऑलिव्ह बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसली आहे.
या फोटोत तिने कमीत कमी मेकअपमध्ये लुक केला आहे आणि केस मोकळे सोडले आहेत. या फोटोसोहबत तिने एक पोस्टही केली आहे. या फोटोला इंस्टाग्रामवर 2 लाखांपेक्षाही जास्त लाईक्स मिळाले आहेत तसेच अनेक सकारात्मक कमेंट्सही मिळाल्या आहेत. सुहानाची खास मैत्रिण अनन्या पांडेने देखील तिला कमेंट केले आहे. तिने कमेंटमध्ये तू माझी सर्वकाही आहेस असे लिहिले आहे.
सुहानाने गेल्या महिन्यात स्पष्ट केले होते कि कशाप्रकारे तिला तिचा रंग सावळा असल्यामुळे ट्रोेल केले गेले होते. ती 12 वर्षांची असताना तिचा रंगावरुन तिला ट्रोल केले होते. सुहाना न्यूयॉर्कमध्ये चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेते आहे. सध्या ती मुंबईत कुटुंबासोबत वेळ सुट्या घालवते आहे.