महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Marathon : रस्ते अपघातानंतर असे टाळा अपंगत्व, मुंबई मॅरेथॉनमधून जनजागृती - Suggested measures prevent disability

कोरोनानंतर तब्बल दोन वर्षांनी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या टाटा मॅरेथॉन स्पर्धेत रस्ते अपघातात अपंगत्व आलेल्या तरुणांनी रस्ते अपघात टाळण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या खबरदारीबाबत आवाहन केले. हातात प्रबोधनात्मक संदेशाचे फलक घेऊन 'व्हील चेअर'वरून स्पर्धेत सहभागी झालेल्या तरुणांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते. कोणत्याही अपघातानंतर कंबरेखाली सपोर्ट घेऊन मदत करावी, असे आवाहन करण्यात आले.

Mumbai Marathon
मुंबई मॅराथॉनमध्ये जनजागृती करताना अपंगत्व आलेले युवक

By

Published : Jan 15, 2023, 5:35 PM IST

मुंबई मॅराथॉनमध्ये जनजागृती करताना अपंगत्व आलेले युवक

मुंबई : दोन वर्षांच्या खंडानंतर यंदा मुंबईत मॅरेथॉनचे आयोजन केले होते. पूर्ण मॅरेथॉन, अर्ध मॅरेथॉन, दहा किलोमीटर धाव, ड्रीम रन, सीनिअर सिटीझन्स रन आणि चॅम्पियन विथ डिसॅबिलिटी रन आदी विभागांमध्ये हजारो धावपटूंसह मुंबई मॅरेथॉनमध्ये तब्बल ५५ हजारांहून अधिक धावपटू सहभागी झाले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून स्पर्धेला पहाटे सव्वापाच वाजता सुरुवात झाली. जगभरातून स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत समाजप्रबोधन करणाऱ्या विविध संघटनांनी लक्ष वेधून घेतले.


जनजागृतीसाठी धावलो :देशासह राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण मोठे आहे. अपघातानंतर मणक्याला मार लागल्यानंतर कमरेखालचा भाग अधू होतो. अनेकांना यामुळे अपंगत्व येते. आजकाल रस्ते अपघाताचे नियम पाळले जात नसल्याने अशा घटना वाढल्या आहेत. फ्रेन्डस फाउंडेशन या संस्थेने रस्ते अपघातात येणाऱ्या अपंगत्वावर मात कशी करता येईल, याबाबत जनजागृती केली. भारतात चार ते साडेचार लाख अपघात होतात. एकदा अपघात झाल्यानंतर त्याचा कुटुंबावर परिणाम होतो. कर्ता व्यक्ती असेल कुटुंबाची गुजराण करताना, अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. यातून मार्ग काढण्यासाठी जनजागृती करत आहोत. वाहन चालवताना चालकाने फोनवर बोलू नये, वेगावर नियंत्रण ठेवावे, सीटबेल्ट लावावा, वाहतुकीचे नियम पाळावेत. अपघात होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात आले. कारण रस्ते अपघातामुळे आलेल्या अपंगत्वाचा आम्ही बळी ठरलो आहोत. आमच्यावर ओढवलेल्या परिणामांची इतरांना जाणीव करून देण्यासाठी आम्ही सहभागी झालो आहोत, अशी माहिती फ्रेंड्स फाउंडेशनचे संचालक अनुपम नेगवी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.


सपोर्ट शिवाय मदत नको :महापे येथे माझा अपघात झाला. अपघात झाल्यानंतर तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, मदतीसाठी आलेल्यांनी स्ट्रेचर किंवा कमरेखाली काहीच सपोर्ट न घेता, हात आणि पायाला धरून उचलले. त्यामुळे कंबरेत गॅप येऊन कायमचे अपंगत्व आले आहे. अपघात झाल्यानंतर कोणालाही मदत करताना, प्रथम कंबरेखाली सपोर्ट घ्यावा, असे आवाहन एका अपघातग्रस्तांने केले.

हेही वाचा :Nitin Gadkari Threat : नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी; नागपूर पोलिसांचे कर्नाटकात छापे

ABOUT THE AUTHOR

...view details