महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sugarcane Farmers : कुठल्याच सरकारवर विश्वास नाही, संघर्ष सुरूच राहणार- राजू शेट्टी - Former MP Raju Shetty

सत्तेत असलेले शिंदे फडणवीस सरकार ( Shinde Fadnavis Govt ) असो अथवा विरोधी बाकांवरील महाविकास आघाडी ( Mahavikas Aghadi ) असो, कोणीही शेतकऱ्यांच्या अथवा जनतेच्या हिताचा निर्णय घेताना दिसत नाही. या सर्व लबाड लोकांबरोबर केवळ संघर्ष करावा ( We have to fight with the government ) लागणार आहे. त्यामुळे आपण संघर्षाच्या भूमिकेत कायम असणार आहे, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ( Self-respecting Farmers Association ) नेते माजी खासदार राजू शेट्टी ( Former MP Raju Shetty ) यांनी ईटीव्ही भारत शी बोलताना दिला.

Former MP Raju Shetty
माजी खासदार राजू शेट्टी

By

Published : Dec 10, 2022, 6:09 PM IST

राजू शेट्टी

मुंबई - राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा संघर्षाच्या पवित्र्यात आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणारी एफ आर पी ही ऊस तुटल्यानंतर पंधरा दिवसात एक रकमी दिली जात होती. मात्र, यावर्षी राज्य सरकारने ( Shinde Fadnavis Govt ) एक तुगलकी निर्णय घेऊन ही रक्कम दोन टप्प्यात देण्याचा निर्णय घेतला. यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे. राज्य सरकारच्या विरोधात शेतकरी आक्रमक झाल्यानंतर राज्य सरकारला जाग आली. अखेर गेल्या आठवड्यात राज्य सरकारने शेतकऱ्यांची ही रक्कम एकाच टप्प्यात देण्याचा निर्णय मान्य केला. मात्र, या संदर्भात अद्यापही अंमलबजावणीसाठी जीआर काढण्यात आलेला नाही. त्यामुळे जर लवकरात लवकर सरकारने हा जीआर काढून शेतकऱ्यांना दिलासा दिला द्यावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. शेतकऱ्यांना दिलासा न दिल्यास पुन्हा एकदा रस्त्यावर उतरून संघर्ष करावा लागणार ( We have to fight with the government ) अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी ( Former MP Raju Shetty ) यांनी व्यक्त केली आहे.

दरवर्षी का करावा लागतो संघर्ष? - गेल्या अनेक वर्षांपासून आपण ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी लढतो आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न काही संपत नाहीत. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात संघर्ष करतो आहे. मात्र, ही सर्व व्यवस्था साखर सम्राटांच्या, पूढार्‍यांच्या भांडवलदारांच्या हातात आहे. त्याच्यामुळे शेतकऱ्याला न्याय मिळणे कठीण होते, असे राजू शेट्टी सांगतात. ऊस उत्पादन शेतकऱ्याला कारखाने विविध मार्गाने पिळवणूक करीत असतात. कधी शेतकऱ्यांचा तोडलेल्या ऊसाला कमी उतारा दाखवला जातो. तर, कधी त्याच्या वजन काट्यात कमी दाखवून त्याच्यावर अन्याय केला जातो.

महामंडळ राजकारणाचा नवा अड्डा -ऊस तोडणी, वाहतुकीसाठी यंत्रणा जरी उभी केली गेली असली तरी, यामध्ये मुकादम हा शेतकरी कारखाने या दोन्ही व्यवस्थेला पीळण्याचा प्रयत्न करतो. ऊस तोडणी महामंडळ आता स्थापन करण्यात आलेले आहे. हे महामंडळ राजकारणाचा नवा अड्डा तयार होऊ नये यासाठीही आता आम्हाला डोळ्यात तेल घालून काम करावे लागणार आहे. तसेच मुकादम ही व्यवस्था बरखास्त करण्यासाठी या महामंडळाच्या माध्यमातूनच मजूर पुरवले जावे, यासाठी आमचे प्रयत्न आहेत. अशा विविध स्तरांवर आम्हाला कारखाने, सरकारची संघर्ष करावा लागतो, असं शेट्टी सांगतात.

कर्नाटक सरकारचे केवळ नाटक - आगामी विधानसभा निवडणुकीत कर्नाटकामध्ये भाजपाचे सरकार निवडून येईल याची शाश्वती भाजपाला वाटत नाही. त्यामुळे जनतेच्या मनामध्ये आपले स्थान निर्माण करायचे असेल सरकार पुन्हा सत्तेत यावे म्हणून जनतेची माथी भडकवण्यासाठी महाराष्ट्र कर्नाटक सीमाबाद पुन्हा एकदा उकरून काढला आहे. कर्नाटक, महाराष्ट्र या दोन्ही राज्यातील सीमावरती भागातील गावांमध्ये जनता ही एकमेकांशी अतिशय सौहर्दाने, आपुलकीने वागते. जनतेमध्ये कुठल्याही प्रकारची नाराजी अथवा रोष परस्परांविषयी नाही. त्यामुळे केवळ मतांच्या राजकारणासाठी भारतीय जनता पक्षाने तिथल्या मुख्यमंत्र्यांनी ही नवीन नाटक सुरू केले आहे. अशी जळजळीत टीका शेट्टी यांनी केली आहे.

कुठल्याच आघाडी, युतीवर विश्वास नाही -एकेकाळी आपण शिवसेना भाजपा युतीचा घटक पक्ष म्हणून होतो. मात्र, युतीने आपली फसवणूक केली. शेतकऱ्यांची घोर फसवणूक केली. त्यानंतर महाविकास आघाडी सोबत आपण गेलो. जनतेच्या शेतकऱ्यांच्या हितासाठी काही चांगले निर्णय घेता येतील असे वाटले. मात्र, त्यातही आपली फसगत झाली. आता शिवसेनेचे हातकणंगले मतदार संघातील खासदार धैर्यशील माने हे शिंदे गटात गेले आहेत. त्यामुळे शिवसैनिकांकडे जागा आहे असे असले तरी आपण शिवसेनेची युती करणार नाही. आपण स्वतंत्रपणे आपला किल्ला लढवणार आहोत या सर्वांच्या विरोधात संघर्ष करणं याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.

ABOUT THE AUTHOR

...view details