महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शुक्रवारपासून साखर कारखान्यांची धुराडी पेटणार, राज्यपालांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय - sugar factory in maharashtra

यावर्षीचा ऊसाचा गळीत हंगाम येत्या शुक्रवारपासून (22 नोव्हेंबर) सुरू करण्याचा निर्णय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतला. राज्यपालांनी आज बैठक घेतली, यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. साखर हंगाम लवकर सुरू झाल्याने गाळप परवाने मिळालेल्या कारखान्यांना तातडीने गाळप सुरू करता येईल.

शुक्रवारपासून साखर कारखान्यांची धुराडी पेटणार

By

Published : Nov 20, 2019, 3:06 AM IST

मुंबई - यावर्षीचा ऊसाचा गळीत हंगाम येत्या शुक्रवारपासून (22 नोव्हेंबर) सुरू करण्याचा निर्णय राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी घेतला. राज्यपालांनी आज बैठक घेतली, यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. साखर हंगाम लवकर सुरू झाल्याने गाळप परवाने मिळालेल्या कारखान्यांना तातडीने गाळप सुरू करता येईल. आगामी गळीत हंगाम बैठकीत प्रलंबित निर्णय मार्गी लागतील असा विश्वास राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला.

शेखर गायकवाड म्हणाले, की 22 नोव्हेंबरपासून राज्यातील कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू होईल. साखर कारखान्यांमार्फत करण्यात येणाऱ्या कपातीबाबत ही आजच्या बैठकीमध्ये निर्णय झाला. गेल्या 25 वर्षांमध्ये राज्य सरकारच्या थकबाकी वरती, साखर कारखान्यांना दिलेल्या कर्जाच्या वसुली संदर्भात बैठकीमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाली. आगामी गळीत हंगामाच्या प्रलंबित निर्णयावर निश्‍चितपणे मार्ग निघेल असे आयुक्त गायकवाड यांनी स्पष्ट केले. केंद्राकडून मिळणाऱ्या अनुदानाबाबत साखर आयुक्तालयामार्फत केंद्राकडे पाठपुरावा केला जाणार आहे. राज्यातील 162 पैकी 105 साखर कारखान्यांना गाळप परवाना दिला असून शेतकऱ्यांची शंभर टक्के पैसे दिलेल्या सर्व कारखान्यांना परवानगी दिली आहे. उरलेल्या साखर कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांचे पैसे आला केलेले नाही ते पैसे दिल्यानंतर त्या साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल असे गायकवाड म्हणाले.

शुक्रवारपासून साखर कारखान्यांची धुराडी पेटणार

पुढील सुनावणीमध्ये प्रलंबित साखर कारखान्यांचे गाळप परवान्या संदर्भात निर्णय होईल असे साखर आयुक्तांनी स्पष्ट केले. राज्यातील सत्ता समीकरणांची जुळवाजुळव सुरू असताना राष्ट्रपती राजवटीमध्ये यंदाचा साखर गाळप हंगाम सुरू होणार का नाही याबद्दलही शंका होती. साधारणपणे मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या मंत्रिगटाच्या समितीच्या बैठकीत तारीख निश्चित झाल्यानंतरच दरवर्षी राज्यातील गळीत हंगाम सुरू होतो.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details