महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Hical Company Case : हिकाल कंपनीच्या कब्जा साठी हालचाली तीव्र, सुगंधा हिरेमठ यांनी उच्च न्यायालयात घेतली धाव; काय आहे प्रकरण - हिकाल

हिकाल कंपनीच्या कब्जासाठी तीव्र हालचालींना सुरूवात झाली आहे. बाबा कल्याणी यांनी 1994 च्या लिखित समझोत्यानुसार व्यवहार केला नसल्याने सुगंधा हिरेमठ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

Hical Company Case
हिकाल कंपनी

By

Published : Mar 24, 2023, 8:41 PM IST

मुंबई : सुगंधा हिरेमठ आणि तिच्या पतीने तसेच तिचा मोठा भाऊ यांनी बाबा कल्याणी आणि कुटुंबाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. दरम्यान, हिकाल या रासायनिक कंपनीच्या कब्जावरून कौटुंबिक संघर्ष तीव्र सुरू झाला आहे. याचिकेत नमूद केले आहे की, नुकसानभरपाई आणि इतर दंड यामुळे आर्थिक एवढ्या मोठ्या परीणाम होतील, असा विचार आमचा नव्हता. आई हिकाल वतीने न्यायालयात सांगितले गेले.

मुंबई उच्च न्यायालयात धाव : हिकाल कंपनीचे शेयर किंमत 307 रुपये भाव होता. तेव्हा त्याचे बाजारातील मूल्य 3 हजार 800 कोटी रुपये इतके होते. सुगंधा हिरेमठ, तिच्या पतीने तसेच तिचा मोठा भाऊ यांनी बाबा कल्याणी आणि कुटुंबाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे आता कुटुंबातील छोटा वाद उग्र होताना दिसत आहे. हिकाल या रासायनिक कंपनीच्या कब्जावरून कलह पुढच्या टप्प्यावर जाण्याची शक्यता आहे.


याचिकेत काय म्हटंलय? : 1994 मध्ये जो ह्या प्रकरणात समझोता झाला होता. त्यात ज्या महत्वाच्या बाबी निश्चित केल्या गेल्या होत्या. त्या समझोत्याच्या अधीन राहून हिरेमठ यांनी बाबा कल्याणी यांना उरलेला हिस्सा विकायचा आहे. हा जो समझोता 1994 मध्ये केला गेला असल्याने त्याचा आधार घेऊनच कंपनीच्या हिस्सा विकण्याचा व्यवहार करावा, असे सुगंध हिरेमठ यांची मागणी आहे.

कोण आहेत बाबा कल्याणी : भारत फोर्जचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब कल्याणी, यांच्या ज्या काही त्यांच्या गुंतवणूक कंपन्या आहेत. त्या विरुद्ध आणि कल्याणी कुटुंबातील सदस्यांविरुद्ध देखील सुगंधा हिरेमाथ वतीने न्यायालयात धाव घेतली. ही धाव गघेतल्याने आता संघर्ष आणखी तीव्र झाला आहे. स्टोक एक्सचेंजकडे हिरेमठ यांनी कबूल केले आहे. दोन्ही गटांचे 2,000 कोटींच्या महसूल कंपनीत प्रत्येकी 34 टक्के भागभांडवल नोंदवलेले आहे. स्टॉक एक्स्चेंजला दाखल केलेल्या फाइलमध्ये, हिकल यांनी सांगितले की, भारत फोर्जचे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक बाबासाहेब कल्याणी, यांच्या ज्या काही त्यांच्या गुंतवणूक कंपन्या आहेत. त्याविरुद्ध आणि कल्याणी कुटुंबातील सदस्यांविरुद्ध देखील सुगंधा हिरेमाथवतीने न्यायालयात धाव घेतली आहे.



कंपनीच्या निवदेनातील मुद्दे : आम्हाला समजले आहे की, कंपनीच्या प्रतिवादींपैकी एक असलेले, कंपनीमध्ये बाबा कल्याणी गटाकडे असलेले शेअर्स दाव्याच्या विषयाचा भाग होत आहेत. त्यामुळे कंपनीला काही आनुषंगिक सवलती दिल्या जातात. कोणत्याही प्रकारे, प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, KICL (गुंतवणूक संस्था) आणि BFIL यांना भागधारक म्हणून विचार करण्यापासून रोखण्याचा दावा केला जावू शकतो. तसेच त्यांना स्वतः आणि/किंवा त्यांच्या एजंटना त्यांच्याकडे असलेले शेअर्स हे कंपनीत हस्तांतरित करण्याची परवानगी देण्यापासून रोखण्यासाठी देखील दावा केला जाऊ शकतो. किंवा कोणत्याही अर्जाला परवानगी देण्यापासून कंपनीच्या शेअर्सच्या खरेदी विक्रीसाठी, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार, कंपनीविरुद्ध दावा केला जातो, ही देखील बाब कंपनीच्या निवेदनात उच्च न्यायालयात नमूद केली आहे.

दाव्यावर भाष्य करण्यास नकार : 1990 च्या दशकात हिरेमठ यांनी कल्याणी यांच्याकडून कर्ज घेऊन त्याच्या बदल्यात कल्याणी हिरेमठ यांना त्यांचा हिस्सा देईल हे जर लेखी करार करून ठरवले गेले आहे. तर त्यानुसार पुढील बाबी कराव्यात. तसेच जेव्हा हिकाल रासायनिक कंपनीचे समभाग प्रति भाग हा 307 रुपयांना होता. त्याचवेळी बाजार बंद झाला होता. तेव्हा त्याचे एकूण समभागाचे मूल्य हे तीन हजार 800 कोटी रुपये किंमत होते. ही त्यावेळच्या कररामधील महत्वाची बाब त्यावर कोणत्याही रीतीने पालन झालेच नाही. यावर बायबॅक आजपर्यंत झालेला नाही. बाबा कल्याणी समुहाला गुरुवारी आलेला ईमेल पेपर प्रेस होईपर्यंत अनुत्तरित राहिला. बाबा कल्याणी यांनीही हिकालच्या दाव्यावर भाष्य करण्यास नकार दिला.


हेही वाचा : Eknath Shinde on Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधातील आंदोलनावर मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे वक्तव्य, म्हणाले, ' पंतप्रधानांचा अपमान हा...'

ABOUT THE AUTHOR

...view details