मुंबई-राज्याच्या काही भागात अतिवृष्टी तर काही भागात अजूनही पाऊस पडलेला नाही. त्यामुळे आवश्यक असेल तर अशा धरण क्षेत्रावर पाऊस पाडण्याची चर्चा आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
आवश्यकतेनुसार धरण क्षेत्रात कृत्रिम पावसाचे प्रयोग : सुधीर मुनगंटीवार - Mumbai
आवश्यक असेल पाऊस न झालेल्या धरण क्षेत्रावर पाऊस पाडण्याची चर्चा आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याचे राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.
वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार
धरणांच्या सुरक्षेचा मंत्रिमंडळ बैठकीत आढावा झाल्यानंतर मुनगंटीवार म्हणाले, आवश्यक असलेले ढग आल्यानंतर तेथे कृत्रिम पावसाची तयारी होईल. धरणांवरील यंत्रणा बंद असल्याबाबत ते म्हणाले की राज्य सरकार या प्रकाराकडे गंभीरतेने लक्ष देईल. तसेच नवीन आणि जुन्या धरणाची डागडुजी करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.