मुंबई -रविवारी बीकेसी परिसरात 6 फूट लांबीच्या अजगराची यशस्वी सुटका सर्प मित्रांनी केली. त्यानंतर पुन्हा एकदा या परिसरातील भारत नगरच्या मिठी नदी काठावर गुरुवारी मध्यरात्री साडे आठ फूट लांबीचा अजगर आढळला आहे. सर्पमित्र अतुल कांबळे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी यशस्वीपणे अजगराला जंगलात सोडून दिले.
बीकेसी परिसरात पुन्हा आढळला अजगर हेही वाचा - गुंगीचे औषध पाजून अल्पवयीन मुलीवर अत्याचार
बीकेसी पोलीस ठाण्याचे हवालदार महेश बाळु काळे यांना भारत नगर मिठी नदीच्या पुलावर रात्री दीड वाजेच्या सुमारास एक मोठा अजगर दिसला होता. तशी कल्पना त्यांनी सर्प मित्र अतुल कांबळे यांना फोन वरुन दिली. कांबळे यांच्या सहकाऱयांनी या अजगराची सुरक्षीत सुटका करत शुक्रवारी सकाळी अजगराला ठाणे येथील जंगलात सोडून दिले. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स हद्दीत मेट्रोचे काम सुरू असल्याने जमिनीला हादरे बसत असल्याने या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात साप आणि अजगर बाहेर पडत आहेत. आतापर्यंत या भागात 17 अजगर सापडले आहेत.
हेही वाचा -पत्नीचा खून करून केला अपघाताचा बनाव, 24 तासात पती ताब्यात