महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत शालिमार एक्सप्रेसमध्ये जिलेटीनसदृष्य कांड्या सापडल्याने खळबळ - IED Bomb

ट्रेनमध्ये साफसफाई करण्यासाठी गेले असता त्याला ही पाच जिलेटीन कांड्यासारखी दिसणारी वस्तू दिसली. यानंतर सफाई कामगारांनी याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली.

श्वानपथक तपासणी करताना

By

Published : Jun 5, 2019, 4:08 PM IST

Updated : Jun 5, 2019, 4:28 PM IST

मुंबई- शहरात आज (बुधवार) रमझान ईद साजरी होत असताना लोकमान्य टिळक टर्मिनस येथील कारशेडमध्ये उभ्या असलेल्या शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटीनसदृष्य कांड्या सापडल्या आहेत. रेल्वेच्या जनरल डब्यामध्ये सापडलेली ही वस्तू जिलेटीनच्या कांड्याप्रमाणे दिसत आहेत. यामुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

रमझान ईदच्या पार्श्वभुमीवर शहरात मोठा घातपात घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? याचा तपास पोलीस करत आहेत. एक्स्प्रेसमध्ये जिलेटिनच्या कांड्या कशा पोहोचल्या, याचा तपास सुरक्षा यंत्रणा करत असून या गोंधळामुळे लोकमान्य टिळक टर्मिनसमधील वाहतूक काही काळ खोळंबली होती.

शालिमार एक्सप्रेसमध्ये जिलेटीनसदृष्य कांड्या सापडल्याने खळबळ

पश्चिम बंगालमधील हावडा येथून निघालेली शालिमार एक्स्प्रेस आज सकाळी ८.१० च्या दरम्यान लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहचली. सफाई कामगार या ट्रेनमध्ये साफसफाई करण्यासाठी गेले असता त्याला ही पाच जिलेटीन कांड्यासारखी दिसणारी वस्तू दिसली. यानंतर सफाई कामगारांनी याची माहिती रेल्वे पोलिसांना दिली. यानंतर या घटनेचा तपास सुरू झाला. एक्स्प्रेसमध्ये जिलेटीनच्या कांड्या सापडल्याने रेल्वेमधील सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.

रेल्वे पोलीस, जी. आर. पी ही स्फोटके कुठून आली याचा तपास करत आहेत. श्वानपथक, बॉम्ब शोधक व नाशक पथकांनीही घटनास्थळी धाव घेतली. या स्फोटकाबरोबर एक पत्र ही सापडले आहे. या घटनेमागे कोणाचा हात आहे याचा तपास पोलीस करत आहेत.

Last Updated : Jun 5, 2019, 4:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details