मुंबई -येथील मतदारांचे पंचनामे करण्यात आले आहेत. यात सुमारे १ लाख १८ हजार मतदार अनोळखी आढळून आले आहेत. संबंधित मतदारांनी आपले फोटो येत्या ८ जुलैपूर्वी मतदार संघात जमा करावीत, अन्यथा त्यांचे नाव वगळण्यात येईल, असा इशारा मुंबईचे जिल्हाधिकारी तथा निवडणूक अधिकारी राजीव निवतकर दिला. मतदारांची यामुळे धावपळ उडाली आहे.
१ लाख १८ हजार ओळखपत्र विनाफोटो -
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार यादी तपासण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. नावात दुरुस्ती, चुकीचा पत्ता, मतदार कार्डावर ओळखपत्र किंवा चुकीचा ओळखपत्र लागल्यास सुधारणा केली जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार अचूक मतदार यादी तयार करण्यावर भर दिला आहे. घरोघरी जाऊन मतदारांची माहिती घेण्यात आली. दरम्यान, मुंबईत १ लाख १८ हजार मतदारांच्या ओळखपत्रावर फोटो नसल्याची बाब निदर्शनास आली.