मुंबई -भारतीय जनता पक्षाचे नेते डॉक्टर किरीट सोमय्या ( BJP leader Kirit Somaiya ) यांनी ठाकरे परिवारावर आरोप केला आहे. मुरुड तालुक्यातील कोर्लई गावात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray bungalows ) यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी घेतलेल्या जागेवर १९ बंगले होते. त्यामध्ये घोटाळा झाला असल्याचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही मान्य केले आहे. हे बंगले रश्मी ठाकरे यांच्याशी संबंधित अन्वय नाईक यांनी २००९ मध्ये बांधले. २०१४ मध्ये ठाकरे कुटुंबीयांनी ते विकतही घेतले असल्याचा आरोप सोमय्या ( BJP leader Kirit Somaiya ) यांनी केला आहे.
बंगरे गेले कुठे -त्यानंतर हे बंगले रश्मी ठाकरे ( Rashmi Thackeray ) यांच्या नावावर झाले. २०२० मध्ये त्यांनी १९ बंगल्यांचा मालमत्ता करही भरला. रश्मी ठाकरे, मनिषा वायकर यांनी हा कर भरला आहे. एवढंच नाही तर, त्यापूर्वीची दोन वर्षे रश्मी ठाकरे यांनी, त्याआधी सहा वर्षांचा मालमत्ता कर अन्वय नाईक यांनी भरला आहे. मात्र, आता हे बंगले गायब आहेत. हे बंगले एका रात्रीत कुणी तोडले? कुणी चोरले? तसेच याबाबतचा आदेश कुठल्या अधिकाऱ्याने दिला? बंगले तोडण्याची परवानगी घेतली होती काय? या सगळ्याचा तपास होणार आहे, असे सोमय्या यांनी सांगितले.