महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सुभाष घई, प्रशांत दामले यांच्यासह ४५ कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार - कोरोना योद्ध्यांच्या सन्मान

राज्यात कोरोना महामारीमुळे अनेकांवर बरोजगारीची आणि आर्थिक समस्यांची कुऱ्हाड कोसळली होती. मात्र, याही काळात चित्रपट, नाट्य कलासृष्टीबरोबर, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात गरजुंना भरीव मदत करणाऱ्यांचे आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी कोरोना योद्धा म्हणून सन्मान केला.

corona worrior feliceted
कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

By

Published : Nov 1, 2020, 3:54 PM IST

Updated : Nov 1, 2020, 4:58 PM IST

मुंबई - कोरोना काळात आर्थिक संकटात सापडलेल्या पडद्यामागील कलाकारांना मदतीचा हात देणारे अभिनेते प्रशांत दामले यांचा आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला. तसेच निर्माते, दिग्दर्शक सुभाष घई, नगरसेविका अलका केरकर यांसह समाजाच्या विविध क्षेत्रात कोरोना काळात असामान्य कार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचाही यावेळी राज्यपाल कोश्यारी यांनी सत्कार केला.

नगरसेविका अलका केरकर

अनादी काळापासून आपल्या देशातील लोकांमध्ये समाजसेवेची आवड आहे. जनसेवा ही ईशसेवा मानली गेली आहे. समाजाला देणे ही संस्कृती लोकांच्या रक्तामध्ये भिनलेली आहे. त्यामुळे कोरोना काळात समाजासाठी काम करण्यास सर्वच जण काम करण्यास पुढाकार घेतल्याचे यावेळी पाहायला मिळाले, असे यावेळी राज्यपालांनी सांगितले. कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते. समाजातील प्रत्येक घटकाचे कार्य सारखेच महत्वाचे असते. कोरोना देशातून लगेचच जाण्याची चिन्हे नाहीत, त्यामुळे यापुढेही कोरोना योद्ध्यांनी आपापल्या क्षेत्रामध्ये सेवाकार्य सुरू ठेवावे, असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार

या योद्धांचा झाला सन्मान-

विविध रुग्णालयांमधील डॉक्टर्स, परिचारिका, वार्ड बॉईज, स्थलांतरित मजुरांना अन्नधान्य देणारे, गरजू व्यक्तींना व संस्थांना मोफत मास्क, सॅनिटायझर्स, पीपीई किट्स पुरविणाऱ्या दानशूर व्यक्ती अशा ४५ कोरोना योद्ध्यांचा सत्कार यावेळी करण्यात आला. भाभा हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रदीप जाधव, परिचारिका दिपाली इंदुलकर, सफाई कर्मचारी उदयकुमारी चरमर, जसलोक रुग्णालय येथील परिचारिका सोनल घुमे, आरोग्य सेविका लतिका नकते, फादर कॉसमॉस एक्का, होली स्पिरीट इस्पितळाच्या कार्यकारी संचालिका स्नेहा जोसेफ, ट्राफिक वार्डन अनिता लोबो, वैद्यकीय अधिकारी संजय फुंदे, वार्ड अधिकारी सुरेंद्र सिंग, संदीप मुर्जानी व देवयानी वैद्य, जैन संघटनेचे संजय दोषी, रेडीओलॉजिस्ट डॉ. पूजा राजेश छेडा, किशोर मन्याल, महावीर हॉस्पिटलचे प्रकाश कोठारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

प्रशांत दामले यांचा कोरोना योद्धा म्हणून राज्यपालांच्या हस्ते सत्कार
Last Updated : Nov 1, 2020, 4:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details