महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चीनमधील कंपन्यांसोबतचे करार जैसे थे..  प्रकल्प रद्द केलेले नाहीत; सुभाष देसाईंची माहिती - मुंबई लेटेस्ट न्यूज

मॅग्नेटिक महाराष्ट्र 2.0 याअंतर्गत चीनमधील कंपन्यांसोबत केलेल्या करारांना स्टे देण्यात आला आहे. ते प्रकल्प रद्द करण्यात आले नाहीत, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी दिली आहे. लडाखमधील गलवानमध्ये चीनच्या सैनिकांसोबत झालेल्या झटापटीत भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले होते. या प्रकल्पांसदर्भात केंद्र सरकारचे धोरण जाहीर होण्याची वाट पाहत आहे, असे सुभाष देसाई म्हणाले.

Subhash desai
उद्योगमंत्री सुभाष देसाई

By

Published : Jun 22, 2020, 4:42 PM IST

Updated : Jun 30, 2020, 5:26 PM IST

मुंबई- भारत आणि चीन दरम्यान सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या चीन येथील तीन कंपन्यांसमवेत महाराष्ट्र शासनाने 15 जून, 2020 रोजी सामंजस्य करार केले. हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, असे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले आहे. हे करार तूर्तास जैसे थे ठेवण्यात आले आहेत, याचा अर्थ ते रद्द केले असा नसून त्यावरील पुढील कार्यवाही प्रतीक्षाधीन आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

हेंगली, पीएमआय इलेक्ट्रो मोबिलिटी सोल्युशन्स जेव्ही विथ फोटोन आणि ग्रेट वॉल मोटर्स या तीन कंपन्यांनी अनुक्रमे 250 कोटी, 1 हजार कोटी आणि 3 हजार 770 कोटी रुपयांची गुंतवणूक राज्यातील तळेगाव टप्पा-2 पुणेमध्ये करण्यासाठी सामंजस्य करार केलेला आहे. याद्वारे राज्यात एकूण 5 हजार 020 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे. या प्रकल्पांसंदर्भात सध्याच्या वातावरणात केंद्र शासनाकडून स्पष्ट धोरण जाहीर होण्याची वाट पाहण्यात येईल, असेही मंत्री देसाई यांनी स्पष्ट केले आहे.

लडाखमधील गलवानमध्ये भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झटापट झाली.यामध्ये भारताचे 20 जवान हुतात्मा झाले. यामुळे भारत आणि चीनमधील संबंध ताणलेले आहेत. यापार्श्वभूमीवर चिनी कंपन्यांसोबत करण्यात आलेले सामंजस्य करार महाराष्ट्र सरकारने जैसे थे ठेवले आहेत.

Last Updated : Jun 30, 2020, 5:26 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details