महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

फक्त हजार रुपयात नीटसारख्या परीक्षांची तयारी; एमएचसीईटीमध्ये 'हे' विद्यार्थी राज्यात प्रथम - मुंबई

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा आवश्यक असते. मंगळवारी या परीक्षेचा निकाल लागला. त्यामध्ये डीपर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी भरारी घेतली.

फाईल फोटो

By

Published : Jun 5, 2019, 12:24 PM IST

मुंबई - नुकताच निकाल लागलेल्या सीईटी परीक्षेत शहरातील 'डीपर' या संस्थेच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली आहे. खुल्या गटातून विनायक मुकुंद गोडबोले राज्यात प्रथम आला आहे, तर एससी गटातून आदर्श अभंगे राज्यात प्रथम आला आहे. दोघांनाही १०० टक्के मार्क्स मिळाले आहेत. विशेष म्हणजे ही संस्था विद्यार्थ्यांकडून फक्त १ हजार रुपये शुल्क आकारते.

विद्यार्थ्यांच्या निकालाबद्दल सांगताना डीपर संस्थेचे परीष बुटले

अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सीईटी परीक्षा आवश्यक असते. मंगळवारी या परीक्षेचा निकाल लागला. त्यामध्ये डीपर संस्थेच्या विद्यार्थ्यांनी भरारी घेतली. सांगलीच्या शशांक आयतलने ९९.९८ टक्के गुण मिळवले आहेत.

एकीकडे शिक्षणाच्या नावावर बाजारीकरण मांडलेल्या खासगी संस्था विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये घेत असतात. मात्र, डीपर संस्था ही त्याला अपवाद आहे. राज्यातील प्रत्येक गोरगरीब विद्यार्थ्यांना सहजपणे अभ्यास करता येईल यासाठी ही संस्था प्रयत्न करत असते. त्यासाठी विद्यार्थ्यांकडून फक्त १ हजार रुपये शुल्क आकारले जाते. त्यामध्ये नोट्स, परीक्षेची तयारी करून घेतली जाते. अगदी झोपडीतल्या विद्यार्थ्यांनाही नीट, सीईटीसारख्या परीक्षांची उत्तम तयारी करता येत असल्याचे संस्थेचे हरीष बुटले यांनी सांगितले.

  • पीसीएम ग्रुपमध्ये राज्यात प्रथम येणारे विद्यार्थी -
  • राखीव गट
  • नावटक्केवारी
  • आदर्श मुकुंदा अभंगे १००
  • गितांजली वारंगुळे ९९.९९
  • खुला गट
  • नाव टक्केवारी
  • अमन पाटील ९९.९९
  • मुग्धा पोखरणकर ९९.९९

पीसीबी ग्रुपमध्ये राज्यात प्रथम येणार विद्यार्थी -
खुला गट

  • नाव टक्केवारी
  • विनायक गोडबोले १००
  • रुचा पालक्रीतवार ९९.९९

राखीव गट

  • नाव टक्केवारी
  • अभिषेक घोलप ९९.९९
  • गीतांजली वांरगुळे ९९.९९

एकूण सीईटी निकाल

  • गटमुलीमुलेट्रांन्सजेंडरएकूण
  • पसीएम ९८ हजार ७७४ १ लाख ७७ हजार ३८४ ८ २ लाख ७६ हजार १६६
  • पीसीएम १लाख ३४ हजार ६६३ १ लाख ४६ हजार ४८३ ८ २ लाख ८१ हजार १५४

ABOUT THE AUTHOR

...view details