महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Mar 16, 2020, 5:19 PM IST

ETV Bharat / state

'उच्च शिक्षण विभागाच्या परीक्षा रद्द... विद्यार्थ्यांनी घरीच थांबावे'

महाविद्यालयीन परीक्षा सध्या 31 मार्चच्या नंतरच घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे तुर्तास विभातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याची अंमलबजावणी उद्यापासूनच केली जाणार आहे.

students-should-stay-at-home-says-udhay-samant-in-mumabi
'उच्च शिक्षण विभागाच्या परिक्षा रद्द... विद्यार्थांनी घरीच थांबावे'

मुंबई -कोरोनाचा राज्याचा विळखा वाढत आहे. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी शासकीय पातळीवरुन अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर उच्च शिक्षण विभागाच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याात आल्या आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षांचे पुढिल नियोजन येईर्यंत घरीच थांबावे, असे उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केले.

'उच्च शिक्षण विभागाच्या परिक्षा रद्द...

हेही वाचा-कोरोना इफेक्ट : इतिहासात पहिल्यांदाच तुळजाभवानीचे मंदिर बंद

महाविद्यालयीन परीक्षा सध्या 31 मार्चच्या नंतरच घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे तुर्तास विभातील सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. याची अंमलबजावणी उद्यापासूनच केली जाणार आहे. तसेच शिक्षक, कर्मचारी यांनी शक्यतो घरी बसून काम करावे. विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलल्याने घरीच थांबावे, वसतिगृहातील विद्यार्थांनी घरी जावे, अशा सूचना शिक्षणमंत्री सामंत यांनी यावेळी सांगितले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details