मुंबई - विद्यार्थ्यांनी फक्त परिक्षार्थी न होता ज्ञानार्थी व्हावे म्हणजेच परीक्षेतील टक्क्यांच्या पुढे जाऊन विचार करून ज्ञान ग्रहण करावे, असे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले. तर यावर्षीचा शालांत परीक्षेचा निकाल बघता शिक्षकांनी जास्तीत जास्त मेहनत घेऊन निकालाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी केले. मुंबई महापालिकेच्या शाळांमधील दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
विद्यार्थ्यांनी फक्त परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी व्हावे - महापौर विश्वनाथ महाडेश्वर - mumbai
विद्यार्थ्यांनी फक्त परिक्षार्थी न होता ज्ञानार्थी व्हावे म्हणजेच परीक्षेतील टक्क्यांच्या पुढे जाऊन विचार करून ज्ञान ग्रहण करावे, असे प्रतिपादन मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले. तर यावर्षीचा शालांत परिक्षेचा निकाल बघता शिक्षकांनी जास्तीत जास्त मेहनत घेऊन निकालाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांनी केले.
महापालिकेच्या शाळांमधील माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा ना. म. जोशी मार्ग महापालिका शाळा सभागृहात आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी उप महापौर हेमांगी वरळीकर, शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक, सह आयुक्त (शिक्षण) मिलिन सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना महापौर म्हणाले की, महापालिका शिक्षकांमध्ये गुणवत्ता ठासून भरली असून गुणवंत विद्यार्थ्यांसोबत महापालिकेचे शिक्षकसुध्दा अभिनंदनास पात्र असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांनी परिक्षेत कमी गुण मिळाले म्हणून नाराज न होता सर्व विद्यार्थ्यानी नापास मुलांचे प्रगतीपुस्तक हे पुस्तक जरुर वाचावे असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी फक्त परिक्षार्थी न होता ज्ञानार्थी व्हावे म्हणजे परिक्षेतील टक्क्यांच्या पुढे जाऊन विचार करावा ज्ञान ग्रहण करावे, असेही ते म्हणाले. विद्यार्थ्यांनी पुढील आयुष्यात कितीही मोठया पदावर उडी मारली तरी, प्रत्येकाने तारुण्याचा, सौदर्यांचा संपत्तीचा तसेच सत्तेचा कधीही अहंकार करु नये. असेही महापौर म्हणाले. तसेच विद्यार्थ्यांचा भावनांक वाढला तर तुम्ही जीवनातील प्रत्येक समस्येला सामोरे जाऊ शकाल असा विश्वास त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.
शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यावेळी मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, यावर्षीचा शालांत परिक्षेचा निकाल बघता शिक्षकांनी जास्तीत जास्त मेहनत घेऊन निकालाचा टक्का वाढविण्याचा प्रयत्न करावा, असेही त्या म्हणाल्या. दहावीचा अभ्यासक्रम हा ऑक्टोंबरपर्यंत संपवून त्यानंतर सराव परिक्षेव्दारे विद्यार्थ्यांची तयारी करुन घ्यावी असेही त्या म्हणाल्या.तसेच भविष्यकाळात दहावी परिक्षेचा निकाल शंभर टक्के कसा लागेल यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.