महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईची 'आर्टेमिस' रेसिंग कार जर्मनीसाठी सज्ज - आर्टेमिस

5 ते 11 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेमध्ये जगभरातून 120 पथके या स्पर्धेत सहभागी होतील व त्यांची डिझाइन, इंजिनीअरिंग व प्रकल्प व्यवस्थापन कौशल्ये दर्शवतील.

विद्यार्थ्यांनी तयार केलेली आर्टेमिस रेसिंग कार

By

Published : Jun 11, 2019, 4:41 PM IST

Updated : Jun 11, 2019, 5:58 PM IST

मुंबई -जर्मनीतील हॉकेनहेमरिंग येथे होणाऱ्या 'फॉर्म्युला स्टुडंट स्पर्धा' या जागतिक विद्यार्थी रेसिंग स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगचे विद्यार्थी सज्ज झाले आहेत. सोमवारी या विद्यार्थ्यांनी सोमय्या विद्याविहार परिसरात त्यांच्या 'आर्टेमिस'या पहिल्या इलेक्ट्रीक फॉर्म्युला वनसाठीच्या कारचे अनावरण केले.

आर्टेमिस रेसिंग कार बद्दल माहिती देताना शिक्षिका शुभा पंडित व विद्यार्थी वेदांत मोरे


'आर्टेमिस'या पहिल्या इलेक्ट्रीक कारसाठी हे पथक गेले दहा महिने मेहनत घेत आहे. ही फॉर्म्युला रेसकार असून ती 4 सेकंदांत 0 ते 100 किलोमीटर ताशी वेग घेऊ शकते. 5 ते 11 ऑगस्ट या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेमध्ये जगभरातून 120 पथके या स्पर्धेत सहभागी होतील व त्यांची डिझाइन, इंजिनीअरिंग व प्रकल्प व्यवस्थापन कौशल्ये दर्शवतील.


सोमय्या कॉलेजच्या 70 विध्यार्थ्यांचे पथक 'आर्टेमिस' या पहिल्या इलेक्ट्रीक फार्म्युला वन कारच्या संशोधन विकास डिझायनिंग उत्पादन व तपासणीवर काम करत होते. सोमय्या कॉलेजमध्ये गेल्या बारा वर्षांमध्ये 12 सायकल चालवल्यानंतर या वर्षीच्या पथकाने पर्यावरण पूरक आणि निवडण्यासाठी पहिल्यांदाच इलेक्ट्रीक कार बनवून स्पर्धेत उतरण्याचे ठरवले. ही इलेक्ट्रीक कार पेट्रोल डिझेल किंवा गॅसवर चालत नाही ती केवळ बॅटरी चार्जिंगवर चालेल. ही रेसिंग कार वापरात नसताना चार्जिंग कमी होणार नाही. या कारचे वैशिष्ट्य म्हणजे कोणतेही उत्सर्जन करीत नाही.


आम्ही मागच्या दहा वर्षांपासून कार बनवत आहोत पण त्या इंजिन, पेट्रोल, डिझेल, गॅसवर आहेत. पण यावर्षी आम्ही इलेक्ट्रीक कार बनवित एक मोठी झेप घेतली आहे. ह्या कारमधील बॅटरीचे 2 ते 3 तासात चार्जिंग होते हे खास वैशिष्ट्ये आहे, असे विध्यार्थी वेदांत मोरे म्हणाला.


सोमय्या कॉलेज मधील हे पथक 2007 या वर्षापासून ही कार बनवत होते. कारचे वेगळे वैशिष्ट्य असे की, ही कार इलेक्ट्रिक आहे. आता देशाला व समाजाला गरज आहे ती प्रदूषण कमी करण्याचे, त्यामुळे या कारचे महत्त्व आहे, असे प्राचार्या डॉ. शुभा पंडित यांनी सांगितले.

Last Updated : Jun 11, 2019, 5:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details