मुंबई - कोरोना काळात विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिक्षण घ्यावे लागले. परंतु राज्यातील विद्यापीठ व महाविद्यालयांनी प्रत्यके विद्यार्थ्यांकडून संपूर्ण फी घेतली. त्यामुळे सर्व महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील प्रवेश आणि परीक्षा शुल्कात ५० टक्के सवलत देण्याची मागणी स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे.
मुलांचे शैक्षणिक शुल्क कसे भरावेत - पालक
कोरोनाच्या परिस्थितीचा समाजातील प्रत्येक घटकावर परिणाम झाला आहे. देशातील बहुतेक नागरिकांना या साथीच्या रोगाशी लढताना आपले प्राण गमवावे लागले. अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. महाराष्ट्राला या कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला असून रोजगार नसल्याने किंवा उपचारासाठी प्रचंड पैसा खर्च झाल्याने राज्यातील बहुतेक लोकांच्या घरात आर्थिक चणचण निर्माण झाली आहे. कोरोना काळात कॅम्पस बंद असताना सुद्धा राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था प्रवेश व परीक्षेसाठी संपूर्ण शुल्क आकारत आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिक आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. एकीकडे पोटापाण्याचा खर्च काटकसरीने भागवत असताना मुलांची शैक्षणिक शुल्क कसे भरावेत? या चिंता सध्या अनेक पालकांना सतावत आहे.
एसआयओनेउच्च व तंत्रशिक्षण मंत्रांची घेतली भेट
स्टुडंट्स इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया या विद्यार्थी संघटनेने राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. प्रवेश आणि परीक्षा शुल्कात ५० टक्के सुट्ट देण्याची मागणी करत निवेदनही दिले. जेणेकरून या कठीण परिस्थितीत विद्यार्थ्यांचे फी आभावी शैक्षणिक नुकसान होणार नाही. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत उदय सामंत यांनी फी नियमन प्राधिकरणाच्या बैठकीदरम्यान या मागणीवर चर्चा करून निर्णय घेण्याचे आश्वासन एसआयओच्या प्रतिनिधींना दिले आहे.
हेही वाचा- बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची कारवाई