मुंबई - उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यानंतर अखेर शाळेला सुरुवात झाली आहे. 17 जून पासून राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत. सोमवारी शाळेचा पहिला दिवस असल्यानं विद्यार्थ्यांबरोबर पालकांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. मुंबईत पहिल्या दिवशी विद्यार्थी आनंदात शाळेत जाताना पाहायला मिळाले.
पहिली घंटा वाजली..! शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थी उत्साहात - summer holiday
मे महिन्यापासून सुरू झालेली उन्हाळ्याची सुट्टी अखेर आज संपली. सोमवार 17 जूनपासून राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्या आहेत.
मे महिन्यापासून सुरू झालेल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपून बऱ्याच दिवस बंद असलेल्या शाळा सोमवार 17 जूनपासून सुरू झाल्या. विद्यार्थ्यांचा किलबिलाट, मधल्या सुट्टीतली मजा, खेळात हरल्यानंतर त्यांचे उडणारे खटके या सर्वांच्या आवाजानी शाळा गजबजून गेल्या आहेत. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसोबतच पालकांचाही गोंधळ पाल्ल्यांना शाळेत नेताना उडाल्याचं चित्र आज सोमवारी दिसत होते.
उन्हाळी सुट्टी संपून सोमवारपासून राज्यातील सर्व शाळा सुरू झाल्या. यामुळे रविवारी संध्याकाळी पालकांची गणवेश, शालोपयोगी वस्तू, छत्री, रेनकोट यांच्या खरेदीसाठी रविवारी बाजारात एकच गर्दी होती. विद्यार्थ्यांचीही पहिल्याच दिवशी शाळेत लवकर पोहोचण्याची लगबग सुरू झाली आहे. शाळेतील पहिला दिवस हा अविस्मरणीय असतो. मुंबईतही दादर येथील शिशुविहार शाळेत विद्यार्थी मोठ्या प्रमाणात पहिल्या दिवशी शाळेत जाताना दिसले.