महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Namaj Pathan In School : मुंबईतील शाळेत विद्यार्थ्यांना शिकवलं जातय नमाज पठण, ट्रस्टीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी - कपोल विद्यानिधी इंटरनॅशनल स्कूल

मुंबईतील कांदिवलीमधील महावीर नगर मधील कपोल विद्यानिधी (इंटरनॅशनल ) शाळेत विद्यार्थ्यांना दर शुक्रवारी नमाज पठण, अजान पठण शिकवण्यात येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.

शाळेत नमाज पठण
शाळेत नमाज पठण

By

Published : Jun 16, 2023, 2:30 PM IST

शाळेत विद्यार्थ्यांना शिकवलं जातय नमाज पठण

मुंबई : देशात अनेक ठिकाणी धर्मांतरांवरुन वातावरण तापले असतात. मुंबईतील कांदिवलीमधील कपोल विद्यानिधी (इंटनॅशनल) शाळा महावीर नगर शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील विद्यार्थ्यांना शुक्रवारी अजान, नमाज, पठण शिकवण्यात येत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

देशात आणि राज्यात धर्मांतराचे : गेमिंग अॅपच्या माध्यमातून धर्मांत्तर करण्याचे प्रकार समोर आल्यानंतर देशात खळबळ माजली होती. या प्रकरणात शहनवाज नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. युपी पोलीस या आरोपीची चौकशी करत आहेत. गेमिंग अॅपचे प्रकरण ताजे असतानाच मुंबईतील शाळेत विद्यार्थ्यांना नमाज पठण, आणि अजान पठण शिकवण्यात येत असल्याचे समोर आले आहे. शाळेतील हा प्रकार समोर आल्यानंतर पालकांनी शाळेच्या ट्रस्टीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. मुंबईतील कांदिवलीमधील महावीर नगर मधील कपोल विद्यानिधी (इंटरनॅशनल ) शाळेत विद्यार्थ्यांना दर शुक्रवारी नमाज पठण, अजान पठण शिकवण्यात येत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांच्या पालकांनी केला आहे.

(सविस्तर बातमी थोड्याच वेळात...)

ABOUT THE AUTHOR

...view details