महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मराठा आरक्षणाबाबत शासन सकारात्मक नसल्यास आंदोलन - विद्यार्थ्यांचा इशारा - warn

मुंबई उच्च न्यायालयानंतर आता सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठाच्या निर्णयामुळे दंतवैद्यक व वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू होणार नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा समाजातील विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात आले आहेत.

मराठा आरक्षणाबाबत शासन सकारात्मक नसल्यास आंदोलन - विद्यार्थ्यांचा इशारा

By

Published : May 9, 2019, 4:57 PM IST

मुंबई -वैद्यकिय शिक्षणात मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. न्यायालयाने तसा उल्लेखही केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा राज्य शासनाने याचा विचार करावा. जर आमच्या बाजूने राज्य शासन सकारात्मक नसेल तर आम्ही राज्यभर आंदोलन करू, असा इशारा वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थांनी दिला आहे .

मराठा आरक्षणाबाबत शासन सकारात्मक नसल्यास आंदोलन - विद्यार्थ्यांचा इशारा

यंदाच्या शैक्षणिक सत्रात वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मराठा आरक्षण लागू होणार नसल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठाने दिला आहे. वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या सर्व पदव्युत्तर शिक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू करण्यावर काही जणांनी याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयानंतर आता सर्वोच्च न्यायालयातील खंडपीठाच्या निर्णयामुळे दंतवैद्यक व वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत मराठा आरक्षण लागू होणार नाही. त्यामुळे आता पुन्हा एकदा मराठा समाजातील विद्यार्थी आंदोलनाच्या पवित्र्यात आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details