मुंबई: मालाड येथील महापालिकेच्या लव गार्डनमध्ये कबड्डी सामने सुरू असताना ही धक्कादायक घटना घडली. किर्तिकराज मल्लन असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. घटनेनंतर त्याचे पार्थिव शिवचरणासाठी शताब्दी रुग्णालयात नेण्यात आले. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून अधिक तपास सुरू केला आहे.
कार्तिक बी.कॉमचा विद्यार्थी : मिळालेल्या माहितीनुसार, गुरूवारी मित्तल कॉलेजच्या माध्यमातून मालाड पश्चिमेकडील महापालिकेच्या लव गार्डनमध्ये कबड्डी सामन्यांचे आयोजन करण्यात आले होते. कार्तिक हा दिंडोशी संतोष नगर परिसरात राहणारा आहे. तो गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बी.कॉम. प्रथम वर्ष शिक्षण घेत होता. कार्तिकला मित्तल विद्यालयाच्या वतीने खेळण्यासाठी बोलवण्यात आले होते. मात्र गुरुवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास कबड्डीची मॅच सुरू असतानाच कार्तिक राज या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला.
खेळताना झाला बेशुद्ध :आकाश कॉलेज विरुद्ध मित्तल कॉलेज दरम्यान कबड्डीचा सामना सुरू असताना कार्तिक मित्तल कॉलेजच्या वतीने खेळत होता. कार्तिक हा आकाश कॉलेजच्या खेळाडूंच्या खेम्यामध्ये डेडलाईन पार करून त्यांना बाद करण्याचा प्रयत्न करत असताना समोरील खेळाडूंनी त्याला पकडले. त्यावेळी तो बाद देखील झाला होता. मात्र तो माघारी फिरत असताना अचानक बेशुद्ध होऊन खाली पडला. दोन्ही कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी त्याला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांचे प्रयत्न असफल राहिले. विद्यार्थ्यांनी ताबडतोब मालाड पोलिसांना या घटनेची सूचना दिली. तोपर्यंत विद्यार्थ्यांनी कार्तिकला जवळील महापालिकेच्या शताब्दी रुग्णालयामध्ये घेऊन गेले. डॉक्टर आणि त्याला दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले.