महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Action Against Rioters : नाशिक, अकोला, शेवगावातील दंगलखोरांवर कठोर कारवाई करणार; मुख्यमंत्र्यांचे आदेश - Strict action against rioters

नाशिकमधील त्र्यंबकेश्वरमध्ये उरुसावेळी इतर धर्मियांकडून मंदिरात बळजबरीने घुसण्याचा प्रयत्न झाला. अकोला, शेवगावमध्ये जातीय तेढ निर्माण करण्यात आली आहे. राज्य शासनाने या प्रकरणांची गंभीर दखल घेतली असून दोषींवर कठोर कारवाईचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. कोणीही कायदा हातात घेऊ, सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन देखील जनतेला केले.

मुख्यमंत्री
मुख्यमंत्री

By

Published : May 16, 2023, 7:21 PM IST

मुंबई : नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसण्याचा प्रयत्न झाला. अत्यंत गंभीर गोष्ट घडली असून या कृत्यामुळे भारतातील समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्या आहेत. तसेच जिल्ल्ह्यात, राज्यात आणि देशात कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला असून राज्य शासनाने संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली.

महाराष्ट्रात सर्व समाज गुण्यागोविंदाने राहतात. कोणीही कायदा हातात घेऊ नये. सर्व समाजाला सोबत घेऊन, उत्सव करतो. परंतु, काही समाजकंटक जाणीवपूर्वक असे कृत्य करत असतील, त्यांच्यावर सरकार, पोलिस कठोर कारवाई करतील. राज्यात कायदा व सुव्यवस्था राखणे, ही प्रशासनाची जबाबदारी आहे. हा महाराष्ट्र आहे, प्रत्येक समाजातील लोकांनी पुढे येऊन शांतता राखली पाहिजे - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री शिंदे यांचे अवाहन :जिल्ह्यातील लोकांनीही त्यासाठी सहकार्य करायला हवे, अशी भूमिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडली. तसेच राज्यात सर्व जातीपातीची लोकं राहतात. त्यामुळे कुणाच्याही भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी घ्यावी. कुठलेही तणाव पूर्ण वातावरण राहणार नाही, यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांनी केले.


कुणीही कायदा हातात घेऊ नये : अकोला, शेवगाव येथे दंगलींनंतर परिस्थिती नियंत्रणात आहे. घटनेच्या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कुणीही कायदा हातात घेऊ नका. सोशल मीडियावर देखील कोणत्याही पोस्ट टाकताना जबाबदारीने टाकावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यानी केले.


शेतकऱ्यांना दिलासा : अतिवृष्टी, अवकाळी गारपिटीमुळे होणाऱ्या नुकसानीसाठी एनडीआरएफच्या निकषापेक्षा दुप्पट देण्याचा निर्णय घेतला आहे. दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर मर्यादा वाढवण्यात आली आहे. तसेच सततच्या पावसामुळे होणारे नुकसान, नैसर्गिक आपत्तीमध्ये धरले जाणार आहे. शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा मोठा निर्णय आहे. शेतकऱ्यांना यामुळे मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल.

सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी :नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे प्रोत्साहनपर मोबदला दिला जाईल. आघाडी सरकारने हा निर्णय घेतला होता. या निर्णयाची मात्र, आपल्या सरकारने अंमलबजावणी केल्याचे शिंदे म्हणाले. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले जाणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.


वैद्यकीय उपचारांची सुविधा :आषाढीनिमित्त लाखो वारकरी निमित्त जातात. त्यांची गैरसोय होऊ नये, त्यांची कुठेही अडचण होऊ नये, यासाठी प्रशासनाला सूचना, निर्देश सोमवारी दिले आहेत. जवळपास पाच हजार एसटी गाड्या सोडल्याचा निर्णय देखील सरकारने घेतला आहे. बस थांब्यावर पाणी, वैद्यकीय उपचारांची सुविधा आदी महत्वाच्या सेवा सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. तशा प्रकारची कारवाई शासनाच्या माध्यमातून प्रशासन उपलब्ध करुन देणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. विनापरवाना, मद्यपान करुन बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांमुळे अपघात वाढले आहेत. त्याला आळा घालण्यासाठी राज्य शासनाने कंबर कसली आहे. वाहन चालकांवर कठोर कारवाईचे निर्देश पोलिसांना दिल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

  • हेही वाचा -
  1. Nitin Gadkari Threat Call : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी
  2. Trimbakeshwar Temple Nashik : त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेला प्रकार गंभीर ; देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
  3. Pradeep Kurulkar Judicial Custody : प्रदीप कुरुलकर यांना 29 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी; येरवडा कारागृहात होणार रवानगी

ABOUT THE AUTHOR

...view details