मुंबई - वांद्रे-पश्चिम येथे मंगळवारी झालेल्या गोंधळानंतर या परिसराला छावणीचे रूप आले होते. आज (बुधवारी) येथील वांद्रे-पश्चिम बस स्थानकात तणावपूर्ण शांतता पहावयास मिळाली. मंगळवारी झालेल्या गोंधळानंतर बुधवारी मात्र येथे आवश्यक तितकाच पोलीस बंदोबस्त आहे.
मंगळवारी दुपारी 4 वाजता वांद्रे पश्चिम रेल्वे स्थानकबाहेरील बस स्थानकात अचानक अंदाजे 2000 स्थलांतरीत मजूर जमले. त्यांनी आपल्याला आपल्या गावी जायचे होते. म्हणून रेल्वे गाड्या सुरू करा, अशी मागणी करत त्यांनी मोठा गोंधळ घातला. यानंतर येथे मोठ्या संख्येने पोलीस तैनात करण्यात आले. यावेळी त्यांना समजावून सांगितल्यानंतरही हे मजूर ऐकत नसल्याने पोलिसांना लाठीचार्जही करावा लागला होता. मात्र, शेवटी पोलिसांनी ही परिस्थिती योग्य प्रकारे हाताळली.