मुंबई : मुंबई न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर झालेल्या सुनावणीमध्ये आज जावेद अख्तर यांनी आपल्या याचिकेमध्ये मुद्दा मांडला की, एका महत्त्वाच्या सार्वजनिक मुलाखतीवेळी कंगना तिच्याकडून माझी बदनामी केली गेली. त्यामुळे मला ते माझा अपमान झाल्यासारखे वाटते. म्हणून मी तिच्याविरुद्ध न्यायदंडाधिकारीकडे दाद भागण्यासाठी खटला दाखल केला आहे.व तसेच जावेद अख्तर यांनी असे देखील नमूद केले की, कंगना हिने बदनामी केल्यानंतर न्यायालयामध्ये हा खटला दाखल करायला मला चार ते पाच महिने लागले. कारण माझ्यावर प्रचंड दबाव होता.
Javed Akhtar News: मुलाखतीवेळी जावेद अख्तर यांचा अपमान; म्हणून खटला दाखल करावा लागला... - kangana Ranaut Interview
2020 मध्ये एका प्रसिद्ध मासिकाने मुलाखत आयोजित केलेली होती. त्यामध्ये कंगना राणावतने गीतकार, कवी जावेद अख्तर यांची बदनामी केली होती. त्यामुळे याप्रकरणी जावेद अख्तर यांनी मुंबईच्या न्यायालयामध्ये खटला दाखल केला होता. आज या खटल्याच्या सुनावणीसाठी जावेद अख्तर मुंबई दंडाधिकारी न्यायालयात हजर झाले.
वकिलांनी न्यायालयात बाजू मांडली: जावेद अख्तर यांनी न्यायालयासमोर हे देखील मांडले की, अभिनेता सुशांत सिंग आत्महत्या प्रकरणामुळे देशभर प्रसार माध्यमात खूप चर्चा होत होती. सर्वत्र तो चर्चेमध्ये कळीचा मुद्दा ठरला होता. मी कंगना राणावतला आत्महत्या करावी लागेल असे मी बोललो नव्हतो असे ते म्हणाले. उलट एका प्रतिष्ठित मासिकाने घेतलेल्या मुलाखती दरम्यान कंगना हिने असे म्हटले होते की, जावेद यांनी तिला धमकी दिली. परंतु तशी धमकी देण्याचा काही प्रश्नच नाही असे मी काही बोललेलोच नाही. ही जावेद अख्तर यांची बाजू वकिलांनी न्यायालयात मांडली. तर आज या खटल्याच्या सुनावणीसाठी जावेद अख्तर मुंबई दंडाधिकारी न्यायालयात हजर झाले.
जावेद आख्तर यांची उलट तपासणी:कंगना हिच्या वकिलांनी याबाबत अधिक वेळ हवा असे न्यायालया समोर मांडले. त्यानिमित्ताने 12 जून 2023 रोजी होणाऱ्या सुनावणीमध्ये जावेद आख्तर यांची उलट तपासणी केली जाणार आहे. तर हा मुद्दा अधोरेखित केला आहे. तर जावेद यांचे वकील जय भारद्वाज यांनी असे देखील सांगितले की, जुलै 2020 च्या चार ते पाच महिने पूर्वी देखील कंगना हिने जावेद यांची बदनामी केली होती. न्यायदंडाधिकारी न्यायालयाने यापुढील सुनावणी 12 जून रोजी निश्चित केली आहे.