महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वादळसदृश्य परिस्थिती, मासेमारी बोटींना समुद्रकिनारी येण्याच्या सूचना

मोठे वादळ भारताच्या पूर्व मध्य समुद्रतळाशी धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे समुद्रात गेलेल्या मासेमारी बोटींना समुद्रकिनारी येण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिवाय कोस्टगार्डकडून मासेमारी बोटींना समुद्रकिनारी पाठवले जात आहे.

मुंबई
mumabi

By

Published : May 12, 2021, 7:54 PM IST

मुंबई - दक्षिण मध्य अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे वादळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. आता हे वादळ भारताच्या पूर्व मध्य समुद्रतळाशी धडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे समुद्रात गेलेल्या मासेमारी करणाऱ्या बोटींना पुन्हा समुद्रकिनारी कोस्टगार्डकडून पाठवले जात आहे. महाराष्ट्र गोवा, कर्नाटक, केरळ, लक्षदीप यासारख्या समुद्र परिसरातील मच्छिमारांना कोस्टगार्डकडून वादळाबद्दल सूचना देण्यात येत आहे. त्यांना लवकरात लवकर समुद्रकिनारी पोहोचण्यास सांगण्यात येत आहे.

वादळ सदृश्य परिस्थिती, मासेमारी बोटींना समुद्रकिनारी येण्याच्या सूचना

ABOUT THE AUTHOR

...view details