महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Stones at Mantralaya : मंत्रालयावर अचानक सुरू झाला दगडांचा वर्षाव, शोध घेताच आलं 'हे' धक्कादायक कारण समोर - सुधीर मुनगंटीवार

Stones at Mantralaya : गुरुवारी मंत्रालय परिसरात अचानक दगडांचा वर्षाव सुरू झाला. यामुळे मंत्रालयाच्या इमारातीच्या काचा फुटल्या. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाचही नुकसान झालं. सुरक्षारक्षकांनी शोध घेतला असता एक वेगळंच कारण समोर आलं.

Mantralaya
मंत्रालय

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 1, 2023, 6:56 AM IST

मुंबई : Stones at Mantralaya : गुरुवारी दूरध्वनीवरून मुंबईतील मंत्रालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती. त्यानंतर मंत्रालय परिसरात अचानक दगडांचा तुफान वर्षाव सुरू झाल्यानं एकच खळबळ उडाली. मंत्रालय आणि आजूबाजूच्या परिसरात घडलेल्या या विचित्र घटनेमुळं भीतीचं वातावरण पसरलं होतं. यामुळे मंत्रालयाच्या इमारातीच्या तसेच आजूबाजूच्या इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या. इतकेच नव्हे तर मंत्रालयासमोर पार्क केलेल्या अनेक वाहनांच्या काचाही फुटल्या आहेत.

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाचं नुकसान : झालं असं की, मंत्रालयाशेजारी मुंबई मेट्रोचं काम सुरू आहे. दरम्यान, त्याच्या ब्लास्टिंगमुळे उडालेले दगड मंत्रालयाच्या इमारतीवर येऊन धडकले. यामुळे मंत्रालय इमारतीच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या तसेच पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांचंही नुकसान झालं. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचाही फुटल्याची माहिती आहे. मेट्रो सबवे कामाच्या ब्लास्टमुळे हे नुकसान झाल्याचं समोर आलंय. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नाही.

कंपनीच्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल : या प्रकरणी, ज्या कंपनीला हे काम देण्यात आलं आहे, त्या कंपनीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्या कंपनीकडून मोठा निष्काळजीपणा झाल्याचं दिसून आलंय. या आधीही अनेकदा अशा प्रकारचे ब्लास्ट झाले आहेत, ज्याचे धक्के मंत्रालयातील कार्यालयांना जाणवले होते. मात्र गुरुवारी करण्यात आलेल्या ब्लास्टची तीव्रता यापूर्वीच्या ब्लास्टपेक्षा जास्त होती. तसेच या ब्लास्टची कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नव्हती.

मंत्रालय सुरक्षा यंत्रणेची दमछाक : दोन दिवसांपूर्वीच अमरावती जिल्ह्यातील धरणग्रस्तांनी मंत्रालयाच्या मुख्य इमारतीतील संरक्षक जाळ्यांवर उड्या मारून आंदोलन केलं होतं. त्यामुळे पोलीस यंत्रणेची चांगलीच तारांबळ उडाली होती. गुरुवारी झालेल्या या घटनेनं पुन्हा एकदा मंत्रालय सुरक्षा यंत्रणेची दमछाक झाली. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे राज्याचं कारभार चालवणारं मंत्रालय सध्या चर्चेत आहे.

हे ही वाचा :

  1. Bomb Placed In Mumbai Mantralaya : मुख्यमंत्र्यांशी बोलू द्या अन्यथा...; मंत्रालय उडवून देण्याची दुसऱ्यांदा धमकी
  2. Facial Recognition Systems : चेहरा दाखवा आणि मंत्रालयात प्रवेश मिळवा; प्रवेशासाठी आता रांगेची गरज नाही
  3. Mumbai Hoax Call : मंत्रालयात दहशतवादी हल्ल्याची माहिती देणारा बनावट कॉल, आरोपीला आज न्यायालयात करण्यात येणार हजर

ABOUT THE AUTHOR

...view details