मुंबई -मध्य रेल्वेवर एसी लोकल ट्रेनची ( AC Train Increase ) संख्या नुकतीच वाढविण्यात आहे. मात्र एसी लोकल सर्वसामान्यांना परवडणारी नसल्याने एसी लोकलबाबत प्रवाशांमध्ये नाराजी ( Dissatisfaction Among Passengers On AC Train ) दिसून येत आहे. मध्य रेल्वेवर धावणाऱ्या एसी लोकलवर 30 वेळा दगडफेक झाल्याचा घटना घडलेल्या आहे. तर पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलवर दगडफेकीचा फक्त दोन घटना नोंदविण्यात आलेल्या आहे. यामध्ये ट्रेनच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याने रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
हार्बर मार्गावर सर्वाधिक दगडफेकीच्या घटना -पश्चिम रेल्वेनंतर मध्य रेल्वेने आपल्या मार्गावर एसी लोकल चालवण्याची सुरुवात केली आहे. सर्वप्रथम मध्य रेल्वेने 30 जानेवारी 2020 पासून ट्रान्सहार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान पहिली एसी लोकल सुरू केली होती. त्यानंतर मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर 17 डिसेंबर 2020 पासून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण मार्गावर दुसरी एसी लोकल चालविण्यात आली आहे. आता आणखी मध्य रेल्वेचे मुख्य मार्गावर 34 एसी लोकल फेऱ्यांची भर पडल्याने वातानुकूलित लोकल ट्रेनची संख्या दहावरून 44 वर पोहोचली आहे. मात्र, एसी लोकलचे भाडे जास्त असल्यामुळे प्रवाशांमध्ये आजही नाराजी आहे. वर्षभरापासून एसी लोकलचे तिकीट दर कमी करा अन्यथा एसी लोकल बंद करा, अशी मागणी प्रवासी आणि प्रवासी संघटनेकडून होत आहे. मात्र, रेल्वे प्रशासनाकडून अद्यापही याबाबत कोणतीही ठोस भूमिका घेतली नसून उलट एसी लोकल फेऱ्या वाढविण्यात येत आहे. परिणामी गेल्या 14 महिन्यात एसी लोकलवर 30 वेळा दगडफेक झाल्याचा घटना घडलेल्या आहे. यामध्ये ट्रेनच्या खिडक्यांच्या काचा फुटल्याने रेल्वेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. हार्बर मार्गावर एसी लोकलवर सर्वाधिक दगडफेकीच्या घटना घडल्या आहे.