मुंबई -गेल्या एक वर्षापासून संपूर्ण देशात कोरोनाचे थैमान सुरू आहे. मागील वर्षी जेव्हा लॉकडाऊन लावण्यात आला, तेव्हा त्याचे पडसाद हे शेअर बाजारात उमटताना दिसले. परंतु या वेळेस कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे. तरीही शेअर बाजारात 2020 च्या तुलनेने पडझड कमी स्वरूपात पाहायला मिळाली. तसेच अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर शेअर बाजाराची सुरुवात मात्र तोट्यात झाली. सेन्सेक्स 61 अंकांनी खाली 48,629 वर बंद झाला. आयटीसीसह 14 स्टॉक्स वधारले. तोट्यात महिंद्रा आणि टीसीएसचा वाटा होता. दुसरीकडे, निफ्टीही 14 अंकांनी खाली 14,681 वर बंद झाला. शेअर मार्केटचा हा ट्रेंड बऱ्याच दिवसांपासून पाहायला मिळत आहे.
राष्ट्रीय लॉकडाऊन लावल्यास परिस्थिती आणखी बिकट होईल -
बाजारात कोरोनाच्या दुसर्या लाटेविषयी चिंता आहे. प्रत्येक विश्लेषक जमिनी वास्तविकतेचा आढावा घेण्यात व्यस्त आहे. त्यांचा असा विश्वास आहे, की खरेदी विक्री करण्याच्या प्रमाणावर मोठ्या प्रमाणात परिणाम होईल. विशेषत: वाहन, सिमेंट, स्टील, कापड, बँकिंग आणि एनबीएफसी या क्षेत्रांमध्ये बँका आणि एनबीएफसीसाठी कर्जदारांची कमतरता असल्याची चर्चा आहे. सिमेंट, स्टील आणि ऑटो क्षेत्रांबाबत त्यांचे मत आहे, की डिलर्स डिलिव्हरी घेणार नाहीत आणि किरकोळ वापर थांबेल. राष्ट्रीय लॉकडाऊन लावल्यास परिस्थिती आणखी बिकट होईल, असा त्यांचा विश्वास आहे.
अर्थसंकल्पामुळे शेअर मार्केटमध्ये भरभराट पाहायला मिळाली होती-