मुंबई - माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात काही महिन्यांआधी येथे उभारण्यात येणाऱ्या मेट्रोच्या कारशेडसाठी आरेमधील रातोरात हजारो झाडांची रातोरात कत्तल करण्यात आली होती. मात्र, या झाडांच्या कत्तलील शिवसेनेसह, राजकीय पक्ष आणि पर्यावरण प्रेमींचा विरोध होता. आता राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होताच आरेमधींल कारशेडला स्टे देण्यात आला आहे. आरे कारशेडला देण्यात आलेल्या स्टेचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी स्वागत केले आहे.
महापौर किशोरी पेडणेकर प्रतिक्रिया देताना मुंबईत मेट्रोचे जाळे उभारण्यासाठी गोरेगांव आरेमध्ये कारशेड उभारली जाणार आहे. त्यासाठी हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. रातोरात झाडांची कत्तल केल्याने पर्यावरणप्रेमी नागरिकांनी त्याचा निषेध केला आहे. आमचे सरकार आल्यावर आरेबाबत निर्णय घेतला जाईल, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर अनेक नाट्यमय घडामोडी झाल्या. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री पदावर उद्धव ठाकरे यांची निवड झाली. मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारताच आरे मेट्रो कारशेडच्या कामाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली आहे.
हेही वाचा -विधानपरिषदेत रंगणार ठाकरे विरूद्ध राणे सामना? भाजपचा नवा प्लॅन
मुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी आरे संदर्भातील निर्णय घेतली. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाबद्दल बोलताना महापौर किशोरी पेडणेकर म्हणाल्या, रातोरात झाडांची कत्तल केलेली मान्य नाही. आरेतील एकाही झाडाच्या पानाला हात लावू देणार नाही. तसेच निरीक्षणाच्या वेळीच आरेमधील अरेरावी करू नका, मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले होते. मात्र, यानंतर रातोरात झाडे कापण्यात आली.
हेही वाचा -सत्ता पदांमध्ये फेरबदल; आता काँग्रेसचा उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीकडे विधानसभा अध्यक्षपद?
हे योग्य नाही. झाडे सजीव आहेत. ती तोडल्यास मनुष्यवधाचा गुन्हा दाखल होतो. पालिकेचा तसा नियम आहे. त्यावेळी अनेक झाडे कापली गेली अनेक पक्षी जायबंदी झाले हे अनेकांनी पाहिले. याच्यानंतर त्यावर विचारविनिमय होईल. एक झाड मोठे व्हायला २० ते २५ वर्ष जातात. आरेमधील हजारो झाडे तोडली याचे दुःख सर्वांना आहे. शेवटी तो आक्रोश मनुष्य जीवन संपवण्याच्या मुळावर येतो. ते होऊ नये म्हणून मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्टे दिलेला स्टे बरोबर असल्याची प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.