महाराष्ट्र

maharashtra

By

Published : May 15, 2021, 3:40 AM IST

Updated : May 15, 2021, 8:10 AM IST

ETV Bharat / state

तौक्ते चक्रीवादळ : किनारपट्टी भागात सतर्कता बाळगा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना

तौत्के चक्रीवादळाचा प्रभाव पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये दिसणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ज रहावे आणि मनुष्यबळ तसेच साधन सामुग्री तयार ठेवावी, असा सूचनाही मुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत.

Toutke hurricane news
तौत्के चक्रीवादळ : किनारपट्टी भागात सतर्कता बाळगा; मुख्यमंत्र्यांच्या सूचना

मुंबई -अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे महाराष्ट्रातील किनारपट्टीलादेखील धोका आहे. यामुळे अरबी समुद्रातील तौत्के चक्रीवादळाच्या अनुषंगाने किनारपट्टीवरील भागात पूर्णपणे सतर्कता ठेवावी, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

मुख्यमंत्री कार्यालयाने ट्विट करत दिली माहिती -

विविध यंत्रणांनी सावध राहून आवश्यक ते बचाव कार्य करावे, अशा सूचना प्रशासनास देण्यात आल्या आहेत. या चक्रीवादळाचा प्रभाव पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये दिसणार असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी सज्ज रहावे आणि मनुष्यबळ तसेच साधन सामुग्री तयार ठेवावी, असा सूचनाही मुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या बैठकीच्या पूर्वतयारी संदर्भात मुख्यमंत्र्यांनी आज विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला. त्यानंतर ट्विट करत मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाने ही माहिती दिली.

मुख्यमंत्र्यांचे ट्वीट
मुख्यमंत्र्यांचे ट्वीट

किनारपट्टी भागात 17 मेपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस -

येत्या आठवड्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला होता. अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील काही तासात त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल. या दरम्यान महाराष्ट्राच्या किनारपट्टी परिसरात 17 मेपर्यंत मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या अंदाजानुसार गोवा किनारपट्टीवर परिणाम जाणवायला सुरुवात झाली आहे. गोव्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस व झाड पडल्याच्या घटना घडल्याची माहिती हवामान विभागाच्या के.एस. होसाळीकर यांनी दिली आहे.

तौत्के चक्रीवादळ

मुंबईच्या समुद्रातून 18 मेच्या संध्याकाळी मार्गक्रमण करेल -

चक्रीवादळ कोकण आणि मुंबईच्या समुद्रातून 18 मेच्या संध्याकाळी मार्गक्रमण करेल आणि त्यानंतर ते चक्रीवादळ गुजरातला पार करत पाकिस्तान किनाऱ्याजवळ पोहोचेल, अशी माहिती आयएमडीने दिली. त्यामुळे शनिवारी दक्षिण कोकण आणि गोवाच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडेल. यानंतर ते आणखी तीव्र होत रविवारी व सोमवारी काही ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

असे असेल चक्रीवादळाचे परिणाम -

  • मुंबई, ठाणे, पालघर या जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी पडण्याची शक्यता
  • कोकण आणि जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा व मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
  • रायगड जिल्ह्यातदेखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता
  • मध्य महाराष्ट्र, मराठवाडा-तुरळक पाऊस पडण्याची शक्यता
  • विदर्भ – मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता

हेही वाचा - पुणे : एकाच दिवसात दोन सख्ख्या भावांचा कोरोना उपचारादरम्यान मृत्यू

Last Updated : May 15, 2021, 8:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details