महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ram Kadam : नोटांवर महात्मांच्या बरोबर पंतप्रधान मोदींचा फोटो हवा; राम कदमांचे ट्वीट

नोटांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्रवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi ) यांचा फोटो हवा राम कदम ( MLA Ram Kadam ) यांचे म्हणणे.

Ram Kadam
Ram Kadam

By

Published : Oct 27, 2022, 1:32 PM IST

Updated : Oct 27, 2022, 1:45 PM IST

मुंबई :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Delhi Chief Minister Arvind Kejriwal ) यांनी चलनी नोटांवर गांधीजींसोबत लक्ष्मी-गणेश यांचा फोटो असायला हवा अशी मागणी केली आहे. या अनोख्या मागणीवर आता राजकारण होत असून हा मागणी निवडणुका बघून करण्यात आली आहे. तसेच नोटांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्रवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हवा असे ट्विट भाजप प्रवक्ते, आमदार राम कदम ( MLA Ram Kadam ) यांनी केले आहे.

Ram Kadam


काय म्हटले आहे ट्विटमध्ये ?आपल्या ट्विटमध्ये राम कदम म्हणतात की, घाणेरड्या राजकारणाने प्रेरित काही नेत्यांनी देवी देवतांचे फोटो नोटांवर पाहिजेत अशी मागणी केली आहे. परंतु ही मागणी त्यांनी मनापासून व इमानदारीने केली नसून फक्त निवडणुकांना बघून ही मागणी करण्यात आली आहे. जर ही मागणी त्यांनी मनापासून व इमानदारीने केली असती तर देशाने ती स्वीकारली असती. त्यांना फक्त निवडणुकांच्या दरम्यान आपल्या देवी देवतांची आठवण येते. त्याचबरोबर आपले महापुरुष शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा फोटो देशातील करोडो जनतेला प्रेरणा देईल. हे कोणी नाकारू शकत नाही. हे आपल्या सर्वांसाठी वंदनीय आहेत.


मोदींचाही फोटो हवा ?पुढे राम कदम सांगतात की, आपल्या देशाला विश्वात गौरव देणारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महान त्याग, समर्पण, परिश्रमाची निरंतर पराकाष्ठा आपण कशी नाकारू शकतो. फक्त देशच नाही तर संपूर्ण विश्व नरेंद्र मोदींना भारताला महान बनवण्याच्या त्यांच्या पराक्रमाबद्दल आठवणीत ठेवेल. अखंड भारत, नवा भारत महान भारत असेल असे सांगत त्यांनी ५०० रुपयांच्या नोटांवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, स्वातंत्रवीर सावरकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो सुद्धा ट्विट केला आहे.


काय म्हणाले होते केजरीवाल ?दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्र सरकारला महत्त्वाचे आवाहन केले आहे. भारतीय चलनी नोटांवर गांधीजींसोबत लक्ष्मी-गणेश यांचा फोटो असायला हवा, असे ते म्हणाले. त्यामुळे सुख-समृद्धी येईल आणि संपूर्ण देशाला त्याचा आशीर्वाद मिळेल. नव्या नोटांनी याची सुरुवात करता येईल, असे ते म्हणाले. यासाठी ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्रही लिहिणार आहेत. ते म्हणाले की, देशाची अर्थव्यवस्था वाईट टप्प्यातून जात आहे, डॉलरच्या तुलनेत रुपयाचे अवमूल्यन होत आहे. त्याचा परिणाम सर्वसामान्यांवर स्पष्टपणे दिसून येत आहे. देवाचा आशीर्वाद असेल तेव्हाच आमचे प्रयत्न यशस्वी होतील, असे केजरीवाल म्हणाले. ते म्हणाले की, अनेकवेळा असे घडते की, मेहनत करूनही फळ मिळत नाही. या प्रकरणात, देवाचे आशीर्वाद आवश्यक आहेत. जेव्हा देवतांचा आशीर्वाद असतो तेव्हा त्याचे परिणाम मिळू लागतात.

Last Updated : Oct 27, 2022, 1:45 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details