महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. तडवी आत्महत्या प्रकरण: महिला आयोगाने घेतली दखल, 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश

रॅगिंगच्या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी केलेल्या आत्महत्येच्या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे.

डॉ. तडवी आत्महत्या प्रकरण: महिला आयोगाने घेतली दखल, 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश

By

Published : May 27, 2019, 8:04 PM IST

मुंबई- रॅगिंगच्या छळाला कंटाळून डॉ. पायल तडवी यांनी केलेल्या आत्महत्येच्या घटनेची महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेतली आहे. याप्रकरणी आयोगाने मुंबईतील नायर रूग्णालयाच्या अधिष्ठातांना नोटीस बजावली आहे. त्याबरोबरच कारवाई करण्यासोबत रॅगिंगविरोधी कायद्याच्या अंमलबजावणीचा तपशीलही आयोगाने मागितला आहे.

डॉ. तडवी आत्महत्या प्रकरण: महिला आयोगाने घेतली दखल, 8 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश

नायर रुग्णालयातील डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरणी याप्रकरणी डॉ. हेमा अहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल या तिघींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या महिला डॉक्टर सध्या फरार असून या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरु आहे. त्यावर आता याप्रकरणी रॅगिंग कायद्यानुसार चौकशी करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महिला आयोगाने नायर रुग्णालय प्रशासनाला केली आहे.

  • काय आहे प्रकरण?

वरिष्ठ डॉक्टरांच्या रॅगिंगला कंटाळून 26 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरने आत्महत्या करून आयुष्य संपवले आहे. मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयातील पायल तडवी असे आत्महत्या करणाऱ्या निवासी डॉक्टरचे नाव आहे. पायलने 22 मे रोजी रुग्णालयाच्या परिसरातच गळफास घेऊन आत्महत्या केली होती. रुग्णालयातील 3 वरिष्ठ डॉक्टरांनी जातीयवादी टीका करून पायलचे रॅगिंग केल्याचा आरोप पायल यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details