महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Keshav Upadhye on MVA Gov : राज्याने केंद्राकडून आलेल्या कोरोना मदत निधीचा हिशोब द्यावा - केशव उपाध्ये - केशव उपाध्ये महाविकास आघाडी सरकार टीका

आतापर्यंत कोरोना संदर्भात केंद्र सरकारने राज्याला किती निधी दिला, त्यातील किती निधी खर्च झाला आहे. याचा हिशोबसुद्धा राज्याने जनतेसमोर मांडावा, अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केली. ( Bjp Leader Keshav Upadhye On MVA ) मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

bjp leader keshav upadhye
केशव उपाध्ये

By

Published : Jan 7, 2022, 7:10 PM IST

मुंबई -एकीकडे राज्यात करोनाची परिस्थिती गंभीर असताना दुसरीकडे राज्याची आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. या विषयाला राज्य सरकार गांभीर्याने घेत नाही, असा आरोप भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केला आहे. तसेच केंद्राकडून आलेला मदत निधी राज्यात पडून असून हा मदत निधी सरकारने घोषित करावा, अशी मागणीही केशव उपाध्ये यांनी केली. येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ( Bjp Leader Keshav Upadhye On MVA )

पत्रकार परिषदेत बोलताना भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये

केंद्रीय बैठकीला राज्याची अनुपस्थिती -

कोरोनाची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चाललेली आहे. तर दुसरीकडे मागील दोन वर्षांपासून कोरोनासारख्या महामारीने राज्याचा आर्थिक डोलारा कोसळला आहे. ती परिस्थिती अद्याप पूर्वपदावर आलेली नाही. अशातच केंद्रीय अर्थसंकल्पाअगोदर देशातील राज्यांच्या गरजांनुसार अर्थसंकल्पात आर्थिक तरतूद करण्याकरिता राज्याच्या अर्थमंत्र्यांची बैठक बोलावून चर्चा करण्याची केंद्र सरकारची प्रथा आहे. फेब्रुवारीमध्ये सादर होणारा अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर ३० डिसेंबरला ही बैठक आयोजित केली होती. अनेक राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ), उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार ( Deputy CM Ajit Pawar ) या बैठकीला उपस्थित होते. बैठकीची रीतसर पूर्वसूचना मिळूनही ठाकरे सरकारच्या अर्थमंत्र्यांनी या बैठकीत जाणे टाळले. मात्र, अर्थराज्यमंत्री यांनाही बैठकीला न पाठविता निवासी आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांना पाठविले गेले. यामुळे आगामी अर्थसंकल्पात महाराष्ट्राकरिता केंद्रीय तिजोरीतून अपेक्षित असलेल्या आर्थिक तुटीचा चा तपशील केंद्रापर्यंत पोहचू शकलेला नाही. यामुळे राज्याचे नुकसान होणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. याला सरकारचा निष्काळजीपणा जबाबदार असल्याचे केशव उपाध्ये यांनी म्हटले आहे.

हेही वाचा -Bacchu Kadu Threatened Hemant Deshmukh : 'मी राज्यमंत्री आहे म्हणून सांगा नाहीतर, आत येऊन ठोकले असते'

राज्याने केंद्राच्या मदतीचा तपशील द्यावा -

चारच दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार ( Union Minister Bharti Pawar ) यांनी कोरोना उपाययोजना संदर्भात राज्याच्या सह्याद्री अतिथीगृहात विशेष बैठक घेतली होती. या बैठकीला राज्याचे आरोग्यमंत्री तसेच राज्यमंत्री दोघांनींही पाठ फिरवली असल्याकारणाने सुद्धा केंद्रीय मंत्र्यांनी नाराजगी व्यक्त केली होती. विशेष करून केंद्र सरकार राज्य सरकारला हवी ती मदत द्यायला तयार असताना राज्याकडून याबाबत उदासीनता असल्याचे उपाध्ये यांनी सांगितले. त्याचबरोबर आतापर्यंत कोरोना संदर्भात केंद्र सरकारने राज्याला किती निधी दिला, त्यातील किती निधी खर्च झाला आहे. याचा हिशोबसुद्धा राज्याने जनतेसमोर मांडावा, अशी मागणी केशव उपाध्ये यांनी केली.

ABOUT THE AUTHOR

...view details