मुंबई- राज्याचे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात भाजपने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाविरोधातील पोलीस कारवाईनंतर भाजप नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेवरून नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. केंद्र सरकार औषध कंपन्यांना धमकावत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, राजेंद्र शिंगणे यांनी रेमडेसिविरचा राज्यात अनधिकृत साठा नसल्याचे सांगितल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे. या दरम्यान भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी नवाब मलिक यांच्यावर निशाणा साधला.
रमजानच्या पवित्र महिन्यात खोटं बोलू नये, आचार्य तुषार भोसलेंची नवाब मलिकांवर टीका - आचार्य तुषार भोसलेंची नवाब मलिकांवर टीका
ब्रुक फार्मा कंपनीच्या मालकाविरोधातील पोलीस कारवाईनंतर भाजप नेत्यांनी घेतलेल्या भूमिकेवरून नवाब मलिक यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. केंद्र सरकार औषध कंपन्यांना धमकावत असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, राजेंद्र शिंगणे यांनी रेमडेसिविरचा राज्यात अनधिकृत साठा नसल्याचे सांगितल्यानंतर भाजपने आक्रमक पवित्रा घेत नवाब मलिकांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
नवाब मलिक हे सच्चे मुसलमान नाहीत किंवा ते अल्लाहचे गुनाहगार आहेत, असे ते म्हणाले. "रमजानच्या पवित्र महिन्यात वाईट काम करायचे नसते आणि खोटं बोलायचे नसते हे लहान मुलालाही कळते. पण राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक आज महाभयानक अशा संकटात खोटे बोलून समाजात विष पेरण्याचे काम करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याच लोकांनी त्यांना उघडे पाडले," असे ते म्हणाले. पुढे ते म्हणाले की, "मला वाटतं सत्तेच्या नशेमध्ये रमजानसारख्या पवित्र महिन्याचे पावित्र्य घालवण्याचे काम नवाब मलिक यांनी केले आहे. म्हणून एक तर ते सच्चे मुसलमान नाहीत किंवा अल्लाहचे गुनाहगार आहेत. कारण त्यांनी रोजा सुद्धा तोडला आहे".