महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज्यातील अधिकारी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार दोन दिवसाचे वेतन - state-officer-will-pay-two-days-salary

सध्याची राज्यातील कोविड आपद्ग्रस्त परिस्थिती ही चिंताजनक आहे. अधिकारी महासंघाने राजपत्रित अधिकाऱ्यांचे एप्रिल आणि मे महिन्यातील प्रत्येकी एक असे दोन दिवसांचे पूर्ण वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे.

maharashtra corona
maharashtra corona

By

Published : Apr 26, 2021, 8:37 PM IST

मुंबई-कोरोना आपती निवारणासाठी मुख्यमंत्री सहायता निधीत कार्यरत सेवानिवृत्त राजपत्रित अधिकाऱ्यांचे एप्रिल आणि मे महिन्यातील दोन दिवसांचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले जाणार. यासाठी राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने अर्थमंत्री अजित पवार यांना पत्र लिहले आहे.

दोन दिवसांचे पूर्ण निवृत्ती वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस
सध्याची राज्यातील कोविड आपद्ग्रस्त परिस्थिती ही चिंताजनक आहे. अधिकारी महासंघाने राजपत्रित अधिकाऱ्यांचे एप्रिल आणि मे महिन्यातील प्रत्येकी एक असे दोन दिवसांचे पूर्ण वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याबाबतचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राजपत्र अधिकारी महासंघ हा ७० खाते निहाय राजपत्रित अधिकारी संघटनांचा शासन मान्यताप्राप्त महासंघ असलेने अशा पगार कपातीसाठी व्यक्तिगत संमतीची गरज नाही. विशेष म्हणजे बहुतांश सेवानिवृत्त अधिकाऱ्यांनी देखील एप्रिल आणि मे महिन्यातील प्रत्येकी एक असे दोन दिवसांचे पूर्ण निवृत्ती वेतन मुख्यमंत्री सहायता निधीस देण्याचा मनोदय महासंघाकडे व्यक्त केला आहे. राज्यात कोरोनाची दुसरी लाट आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी राज्यसरकरला निधी कमी पडू न देण्याच्या उद्देशाने हे राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने हे पत्र अर्थमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details