मुंबई :न्यायालयाजीन कामकाजाच्या निमित्ताने वकील पृथ्वीराज झाला हे आपल्या आशिलासोबत बोरवली पोलीस ठाण्यात गेले होते. अपघाताबाबतच्या एका प्रकरणात त्यांना काही माहिती हवी होती. त्या निमित्ताने बोरिवली येथील पोलीस ठाण्यामध्ये संबंधित एका खटल्यातील जामीन संदर्भातील न्यायालयीन कामकाजासाठी ते तेथे उपस्थित होते. त्या ठिकाणी गर्दी होती. गर्दीमध्ये वकील पृथ्वीराज यांचा धक्का साध्या वेशात असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत गीते यांना लागला. हा धक्का लागल्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांना वकिलांच्यावतीने दिलगिरी व्यक्त केली गेली होती. ही घटना 16 मार्च रोजी घडली होती.
वकिलावर हल्ला :याबाबत वकील पृथ्वीराज यांचे म्हणणे असे आहे की, दिलगिरी व्यक्त केल्यानंतर हेमंत गीते यांनी चार वेळा वकील पृथ्वीराज यांच्या कानशिलात लगावली. त्यानंतर मुंबईभर विविध न्यायालयांमध्ये एक दिवस काम बंद आंदोलन केले गेले. तसेच मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे देखील याबाबत तक्रार निवेदन दिले गेले होते. वकिलावर झालेल्या हल्ल्यामुळे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांनी याबाबत मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा देखील केला. त्यानंतर वकिलांनी कारवाई करण्याची मागणी केली.
प्रकरणाची चौकशी :याबाबत राज्य मानवाधिकार आयोगाने स्वतःला असलेल्या अधिकारांतर्गत स्वतःहून या प्रकरणाची चौकशी सुरू केलेली आहे. त्यानंतर त्यांनी मालवणी पोलीस विभागाचे उपायुक्त यांना 5 एप्रिलपर्यंत याबाबत तपशीलवार घटनेचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबाबत सीसीटीव्ही फुटेज देखील त्यामध्ये असायला हवे, असे देखील आयोगाच्या निर्देशामध्ये नमूद आहे. राज्य मानवाधिकार आयोगाने महाराष्ट्र राज्याच्या गृह विभागाला यामध्ये प्रतिवादी केले आहे. तसेच मुंबई पोलीस आयुक्त परिमंडळ 11 यांना देखील यामध्ये त्यांनी प्रतिवादी करत हे निर्देश दिलेले आहे. राज्य मानवाधिकार आयोगाचे न्यायाधीश के.के. तातेड व सदस्य एम. एस. सईद यांनी याबाबत मुंबईतील मालवणी परिमंडळाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शैलेंद्र दिवस यांना हे निर्देश दिलेले आहेत.
गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कारवाई : वकिलांच्या मार्गदर्शक नियमांचे उल्लंघन केल्या प्रकरणी बार कौन्सिलने वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्यावर कारवाई केली. शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. त्यांना 2 वर्षांसाठी निलंबित करण्यात केले आहे.गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून वकिलांसंदर्भातील आचारसंहितेचे मार्गदर्शक नियम आणि तत्वांचे उल्लंघन झाले. त्याचे उल्लंघन गुणरत्न सदावर्ते यांनी सार्वजनिक ठिकाणी केले, असा त्यांच्यावर आरोप होता.
हेही वाचा : Gunaratna Sadavarte: बार कौन्सिल यांच्याकडून गुणरत्न सदावर्ते यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई; 2 वर्षांसाठी केले निलंबित