मुंबई :राज्याचे उच्च शिक्षण संचालक धनराज माने ( Director of Higher Education Dhanraj Mane ) हे वैद्यकीय दृष्ट्या पात्र ठरले नाहीत. त्यामुळे त्यांना हटवले जावे याबाबत अनेक संघटनांनी मागणी केली होती. त्यामुळे आता धनराज माने यांना त्या पदावरून हटवून ( Dhanraj Mane removed from post of director ) तेथे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी असलेले कुलसचिव शैलेंद्र देवळाणकर ( Registrar inCharge University of Mumbai ) यांच्याकडे जबाबदारी दिली आहे.
Dhanraj Mane : शैलेंद्र देवळाणकर आता राज्याचे उच्च शिक्षण संचालक; धनराज माने यांना पदावरून हटवले - शैलेंद्र देवळाणकर आता राज्याचे उच्च शिक्षण संचालक
राज्याचे उच्च शिक्षण संचालक धनराज माने ( Director of Higher Education Dhanraj Mane ) हे वैद्यकीय दृष्ट्या पात्र ठरले नाहीत. त्यामुळे आता धनराज माने यांना त्या पदावरून हटवले. ( Dhanraj Mane removed from post of Director )
वैद्यकीय दृष्ट्या अपात्र : कॉप्स या विद्यार्थी संघटनेने धनराज माने हे वैद्यकीय दृष्ट्या पात्र नाहीत. या संदर्भात माहिती अधिकारात माहिती मागवली होती. त्यासोबतच त्यांनी मागणी केली होती की, जे जे हॉस्पिटलमध्ये धनराज माने वैद्यकीय दृष्ट्या पात्र आहेत की अपात्र आहेत, याची देखील तपासणी केली जावी. या मागणीनंतर शासनाच्या आदेशानंतर उच्च शिक्षण संचालक धनराज माने यांना जे जे हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय चाचणी करावी लागली. वैद्यकीय चाचणीमध्ये स्पष्टपणे धनराज माने वैद्यकीय अपात्र ठरले आहे. त्यांना एका डोळ्याने 10 टक्केच दिसते. त्यामुळे या पदावर ते कार्य करू शकत नाही. त्यामुळे शासनाने त्यांची उचल बांगडी केलेली आहे.
दुय्यम स्वरूपाचे काम सोपवण्यात आले : धनराज माने यांना थेट निलंबित न करता त्यांच्याकडे आता दुय्यम स्वरूपाचे काम सोपवण्यात आलेले आहे. नवीन शिक्षक धोरणा संदर्भातल्या काही जबाबदाऱ्या त्यांना देण्यात आल्याचे समजते. यासंदर्भात कॉप्स विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष अमर एकड ( amar ekad on dhanraj mane ) यांनी पाठपुरावा केला होता. त्यांनी ई टीव्ही भारत सोबत संवाद साधताना सांगितले की, धनराज माने एका डोळ्याने फक्त त्यांना दहा टक्केच दृष्टी होती. त्यामुळे नियमानुसार त्यांना या पदावर राहता येणे कठीणच होते. आम्ही त्या संदर्भात पाठपुरावा केला होता.