महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

State Govt Committee : आता शेतकरी समस्या निवारणासाठी राज्य सरकार समिती नेमणार - कृषी मंत्री

राज्य सरकारच्या वतीने गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात 'एक दिवस बळीराजासोबत' हे अभियान (One day campaign with Baliraja) चालवले गेले. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांशी संवाद (interaction with farmers) साधल्यानंतर समोर आलेल्या त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी (resolve the farmer problems) राज्य सरकारने एक समिती नेमण्याचा निर्णय (state govt appoint committee) घेतला असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. तर अशा अभियानांमुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाही तर त्यांच्या मूळ प्रश्नांची सोडवणूक लवकरात लवकर करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. (Agriculture Minister Abdul Sattar)

State Govt Committee
कृषिमंत्री अब्दुल सत्तार

By

Published : Dec 17, 2022, 12:44 PM IST

मुंबई :राज्य सरकारच्या वतीने गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात एक दिवस बळीराजासोबत (One day campaign with Baliraja) हे अभियान चालवले जात आहे. या अभियानानुसार शेतकरी बांधवांच्या गावात प्रत्यक्ष जाऊन त्यांच्याशी संपर्क (interaction with farmers) साधून त्यांच्या प्रत्यक्ष काय अडचणी आहेत (resolve the farmer problems) हे जाणून घेण्याचा राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. त्यासाठी कृषी आयुक्त कृषी सचिव आणि कृषी मंत्री हे शेतकऱ्यांना प्रत्यक्ष जाऊन भेटत असल्याची माहिती कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी दिली.


चार हजार गावांचा डाटा जमा :आतापर्यंत एक दिवस बळीराजासाठी या अभियानांतर्गत 4116 गावांना भेटी देण्यात आले आहेत या गावातील शेतकऱ्यांच्या सकाळपासूनचा दिनक्रम ते रात्रीपर्यंत शेतकरी काय काम करतो या कामादरम्यान त्याला कोणत्या अडचणींना सामोरे जावं लागतं त्याच्या शेतीच्या अवजारांचे प्रश्न असतील, बी बियाण्याचे, खतांचे प्रश्न असतील, तसेच शेतकऱ्यांना पीक कर्ज मिळाले का त्याची परतफेड कशी सुरू आहे त्यात काही अडचणी आहेत का नवीन तंत्रज्ञान शेतकऱ्याला कसे वापरता येत आहे या अनेक बाबींचा आढावा घेतला गेला. प्रत्येक गावात ग्रामसभा घेऊन सर्व शेतकऱ्यांची संवाद साधण्यात आला असल्याचे सत्तार यांनी सांगितले.


समस्या निवारणाकरिता चार सदस्य समिती :दरम्यान आतापर्यंत राज्यातील 4116 गावांमधील शेतकऱ्यांचा डाटा जमा झाला आहे. या शेतकऱ्यांनी त्यांना येणाऱ्या अडचणी सांगितल्या आहेत या अडचणींचा अभ्यास करून त्या कशा प्रकारे सोडवता येतील यासाठी सचिव गोयल, दांगट, मांइंदे आणि कृषी आयुक्त यांची समिती असणार आहे. ही समिती सर्वांकष अभ्यास करून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उपाययोजना सुचवणार आहे त्यानुसार शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय घेतला जाईल असेही सत्तार यांनी सांगितले.

रविकांत तुपकर, शेतकरी संघटनेचे नेते


अभियानाने शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत- तुपकर
दरम्यान या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हटले आहे की, केवळ एक दिवस बळीराजासाठी चालवून शेतकऱ्यांचे प्रश्न सुटणार नाहीत. राज्य सरकारच्या अभियानाचा कुठलाही प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना झालेला नाही शेतकऱ्यांना आता कोरड्या सार्वतीची गरज नाहीये आज सोयाबीन कापूस उत्पादन शेतकरी आत्महत्या करण्याच्या मनस्थितीत आहे. शेतकऱ्यांना अजून पर्यंत मिळाली नाही पिक विम्याची रक्कम सुद्धा अत्यल्प शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेली आहे त्यात उत्पादन खर्च करून निघणार नाही त्याच्यापेक्षा कमी भाव सोयाबीन कापूस उत्पादन शेतकऱ्यांना मिळतो आहे परिस्थिती आहे ही परिस्थिती आहे. आणि आम्हाला दिवसाची वीज पाहिजे रात्रीची नको ती रात्रीची आणि ती सुद्धा कमी प्रमाणामध्ये मिळते आहे शेतकरी चहुबाजूनी संकटात सापडला आहे. त्याच्यामुळे मंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या घरी यावं मुक्कामी राहावं आमच्या सोबत बोलाव एवढ्याने आमचे प्रश्न सुटणार नाहीत. प्रत्यक्ष शेतकऱ्यांना सरकारने मदत केली पाहिजे अशी आमची मागणी आहे निव्वळ जखम मांडीला आणि पट्टी शेंडीला असं करून चालणार नाही. खरोखर शेतकऱ्यांना जर का सरकारला मदत करायची असेल तर सोयाबीनला साडेआठ हजार कापसाला किमान साडेबारा हजार रुपये भाव मिळण्यासाठी आयात नियात धोरणात बदल केला पाहिजे शेतकऱ्यांना दिवसाची वीज मिळाली पाहिजे. आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची शंभर टक्के मदत मिळाली पाहिजे अशा पद्धतीने जर का सरकारने मदत केली तर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा मिळू शकतो अशी प्रतिक्रिया तुपकर यांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details