मुंबई- राज्य सरकारने बुधवारी (१२ फेब्रुवारी) चार सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात अन्न व औषध प्रशासन आयुक्त पल्लवी दराडे यांची बदली केली आहे. त्यांच्या जागी मदत व पुनर्वसन विभागाचे सहसचिव ए. बी. उन्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकारने चार वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांच्या केल्या बदल्या; 'हे' आहेत नवे अधिकारी - ratnagiri
राज्य सरकारने केलेल्या बदल्यांमध्ये पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त लक्ष्मी नारायण मिश्रा यांची रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे. पवनीत कौर, यांची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या आयुक्तपदी बदली केली आहे. वस्त्रोद्योग विभागाच्या संचालिका डॉ. माधवी खोडे चवरे यांची जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
राज्य सरकार
राज्य सरकारने केलेल्या बदल्यांमध्ये पशुसंवर्धन विभागाचे आयुक्त लक्ष्मी नारायण मिश्रा यांची रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्तीकेली आहे. पवनीत कौर, यांची आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे आयुक्तपदी बदलीकेली आहे. वस्त्रोद्योग विभागाच्या संचालिका डॉ. माधवी खोडे चवरे यांची जळगाव महानगरपालिकेच्या आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
हेही वाचा-चंद्रकांत दादांना पडलंय मुख्यमंत्री पदाचं स्वप्न ! सामनातून टोचले कान