मुंबई : मराठी ही राज्यातील राजभाषा आहे. मराठी भाषा सर्वच भाषिक शाळांमध्ये शिकवली जावी, अशी मागणी केली जात होती. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनाही मराठी भाषा शिकवण्याचे निर्देश दिले होते. या शाळांमधील विद्यार्थ्यांना हा विषय आणि अभ्यासक्रम नवा असल्याने दहावीच्या परीक्षेत नापास होण्याची आणि मार्क्स कमी येण्याची भीती होती. ही भीती सरकारकडे व्यक्त करण्यात आली होती.
केंद्रीय विद्यालयातील मराठी भाषा : मराठी ही राज्यातील राजभाषा आहे. मराठी भाषा सर्वच भाषिक शाळांमध्ये शिकवली जावी, अशी मागणी केली जात होती. राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने केंद्रीय विद्यालयातील विद्यार्थ्यांनाही मराठी भाषा शिकवण्याचे निर्देश दिले होते. या शाळांमधील विद्यार्थ्यांना हा विषय आणि अभ्यासक्रम नवा असल्याने दहावीच्या परीक्षेत नापास होण्याची आणि मार्क्स कमी येण्याची भीती होती. ही भीती सरकारकडे व्यक्त करण्यात आली होती.
ग्रेड्स देण्याचा निर्णय : केंद्रीय विद्यालयात या आधी कधीही मराठी विषय न शिकलेल्या विद्यार्थ्यांना थेट दहावीसाठी मराठी विषय सक्तीचा करण्यात आला आहे. यामुळे दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्क्स मिळवण्यात अडचण निर्माण झाली आहे. मराठीत कमी मार्क्स मिळाल्याने त्या विद्यार्थ्याची एकूण टक्केवारी कमी झाली असती. यामुळे त्याचे नुकसान झाले असते. त्यामुळे दहावीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मराठी विषयात मार्क्स देण्याऐवजी ए, बी आणि सी असे ग्रेड्स देण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
पुढील तीन वर्षे ग्रेड्स देणार :केंद्रीय विद्यालय यांनी मराठी विषयाचा अभ्यासक्रम त्यांच्या स्थरावर तयार केला आहे. त्यात बदल करण्याचा सल्ला राज्य सरकार किंवा राज्य सरकारचा शिक्षण विभाग देऊ शकत नाही. दहावीमधील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून या वर्षी ग्रेड दिले जाणार आहेत. सध्या सातवी ते नववीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी पुढील तीन ते चार वर्षे ग्रेड देण्याचा विचार असल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.
महाराष्ट्र सरकारचा मोठा दिलासा :मुंबई आणि महाराष्ट्रातील केंद्रीय शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. सध्या दहावीच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सरकारने आता दिलासा दिला आहे. त्यांना यावेळी मराठी भाषेच्या पेपरमध्ये गुणांऐवजी ग्रेड देण्यात येणार आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मराठीचा पेपर सक्तीमुळे अडचणीत सापडलेल्या केंद्रीय शाळांमधील विद्यार्थ्यांना दिलासा देणारी बातमी आहे. केंद्रीय बोर्डाच्या दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणांऐवजी ग्रेडची सुविधा दिली जाणार आहे, अशी घोषणा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी केली आहे.
मराठी अभ्यासक्रमामुळे त्यांच्या निकालावर परिणाम नाही :नवीन मराठी अभ्यासक्रमामुळे त्यांच्या निकालावर परिणाम होऊ नये म्हणून हे केले जात असल्याचे त्यांनी सांगितले. मंत्री केसरकर म्हणाले की, ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता सातवी, आठवी किंवा नववीमध्ये मराठीचा अभ्यास केलेला नाही, त्यांना या पेपरमध्ये कमी गुण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांचा निकाल खराब होऊ शकतो, याची जाणीव सरकारला आहे. त्यामुळे यंदाच्या दहावीच्या परीक्षेत त्यांना गुणांऐवजी ‘ए-बी-सी’ ग्रेड देण्यात येणार आहेत. जेणेकरून त्यांना उत्तीर्ण होणे सोपे जाईल आणि मराठीत कमी गुण मिळाल्याने त्यांची टक्केवारी कमी होणार नाही.
हेही वाचा :Balasaheb Thorat Resign : काँग्रेसच्या बुडत्या जहाजात कुणीही बसायला तयार नाही; थोरातांच्या राजीनाम्यावर बावनकुळेंची खोचक टीका