मुंबई - मुंबई महानगर क्षेत्रातील वीज खंडित झाल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने या घटनेची चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांच्याशी देखील त्यांनी चर्चा केली. मुंबई तसेच मुंबई महानगर क्षेत्रातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने सर्वतोपरी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या आहेत. याचबरोबर भविष्यात परत अशी घटना घडू नये, यासाठी सतर्कता बाळगावी, असेही त्यांनी सांगितले.
मुंबई वीजपुरवठा खंडित झाल्याप्रकरणी मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबई वीजपुरवठा खंडित झाल्याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. याचबरोबर भविष्यात परत अशी घटना घडू नये, यासाठी सतर्कता बाळगावी, असेही त्यांनी सांगितले.
मुंबईतील संपूर्ण वीज जाण्याच्या घटनेमागे कोणते तांत्रिक दोष आहेत. तसेच या घटनेस कोण जबाबदार आहे, त्याबाबत चौकशी करण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. रुग्णालयांना वीजपुरवठा अबाधित राहण्यासाठी पर्यायी व्यवस्था सुरळीतपणे सुरू राहावी, जेणेकरून अडचण होणार नाही, याबाबत महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनाही सूचना दिल्या.
सकाळी दहापासून खंडित असलेला मुंबईतील वीजपुरवठा आता हळूहळू पूर्वपदावर येतो आहे. मध्य, पश्चिम आणि हार्बर या तीनही मार्गावरील लोकलसेवा तब्बल अडीच तासांनंतर पूर्वपदावर आणण्यात यश मिळाले आहे. पश्चिम उपनगरानंतर आता अंधेरीमधील वीजपुरवठाही सुरळीत झाला आहे.