महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Vande Mataram Campaign : 'वंदे मातरम्​'​ शासन आदेश केराच्या टोपलीत; महिनाभरातच सरकारला पडला विसर - Vande Mataram campaign

राज्य सरकारने जारी केलेल्या शासनादेशाचा त्यांनाच विसर पडल्याचे दिसत आहे. 'वंदे मातरम्​'​ शासनादेशाकडे महिनाभरातच सरकारने दुर्लक्ष केले आहे. कोणतेही संभाषण सुरू करताना हॅलो ऐवजी ​​'वंदे मातरम्​'​ ​ने​ सुरुवात करावी असा हा शासनादेश ( State Government Neglect Vande Mataram campaign ) होता.

Forest and Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar
वन आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार

By

Published : Dec 10, 2022, 10:22 AM IST

मुंबई : एक नवा शासनादेश राज्य सरकारने जारी केला ( Vande Mataram instead Hello ) होता. देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र सरकारने सर्व शासकीय - निमशासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये आदी ठिकाणी अभिवादन करतांना, तसेच संभाषण करताना हॅलो ऐवजी ​​'वंदे मातरम्​'​ ​ने​ सुरुवात करण्याची ( Speak Vande Mataram instead of Hello ) होता. त्याबाबतचा शासनादेश राज्य सरकारने काढला होता. मात्र, महिनाभरातच शासकीय कार्यालये, मंत्र्यांची दालने आणि राज्यकर्त्यांना या निर्णयाचा विसर पडल्याचे दिसून ( State Government Neglect Vande Mataram campaign ) येते.

महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त शुभारंभ : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त राज्यभरात ​'​हॅलो​' ​ऐवजी ​​'वंदे मातरम्​'​ या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. वन आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना ‘हॅलो’ ऐवजी ​​'वंदे मातरम्​'​ ​ने संभाषणाची सुरुवात करावी असे आवाहन ( Vande Mataram campaign ) केले. सांस्कृतिक कार्य विभागाने या संदर्भातील शासनादेश काढला. कार्यालयात, संस्थांमध्ये येणाऱ्या व्हिजिटर्सनीही सार्वजनिक जीवनात ​​'वंदे मातरम्​'​ने सुरुवात करून जनजागृती करावी, विविध बैठका - सभांमध्ये ही 'वंदे मातरम्' सुरुवात करावी, असे शासनादेशमध्ये नमूद केले. संपूर्ण राज्यभर हा निर्णय लागू करण्यात आला. मात्र सांस्कृतिक विभाग वगळता मुख्यमंत्री कार्यालय, उपमुख्यमंत्री कार्यालय, इतर मंत्र्यांचे कार्यालय असो कोणत्याही शासकीय कार्यालय आणि राज्यकर्त्यांनी हा आदेश गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही.


लवकरच अंमलबजावणी होईल : स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजांच्या गुलामगिरी मोडीत काढत, हातात तिरंगा घेऊन 'वंदे मातरम्​'चा नारा दिला. त्यामुळे हॅलो ऐवजी वंदे मातरम्' निर्णय घेतला आहे. हा निर्णय लागू झाल्यापासून अनेक विभागात वंदे मातरम् बोलले जाते. मंत्रालयातील वन आणि सांस्कृतिक कार्य विभागामध्ये कर्मचारी ही दूरध्वनीवर बोलतांना वंदे मातरम् म्हणत आहेत. लवकरच इतर विभाग ही शासन निर्णयाचे पालन करतील, असे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ( Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar ) सांगितले.

मी, जय महाराष्ट्र म्हणेन :मी 'वंदे मातरम्​' ऐवजी जय महाराष्ट्र म्हणेन, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया देत विरोध दर्शवला होता. तसेच अनेक जण वंदे मातरम् बोलत नाहीत. शिवसैनिक फोनवर बोलताना आजही, 'जय महाराष्ट्र' अशी सुरुवात करतात. बाळासाहेबांची ही शिकवण आहे. तर पोलीस बांधव 'जय हिंद' बोलतात, असे भुजबळ यांनी सांगत मुख्यमंत्र्यांनी सांस्कृतिक मंत्र्यांना विचारायचे का, की फोनवर काय बोलू, असा टोला लगावला होता. त्यामुळे यावरून चांगलाच वाद रंगला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details